शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भारतात येणार का शक्तिशाली Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro? पाहा कंपनी काय म्हणते 

By सिद्धेश जाधव | Updated: October 21, 2021 17:31 IST

Google Pixel 6, Pixel 6 Pro India Launch And Price: गुगलने याच आठवड्यात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले आहेत. 28 ऑक्टोबरपासून या फोन्सची विक्री सुरु होईल.

टेक दिग्गज गुगलने याच आठवड्यात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले आहेत. ये दोन्ही स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी फक्त आठ देशांमध्ये उपलब्ध झाले आहेत आणि 28 ऑक्टोबरपासून या फोन्सची विक्री सुरु होईल. Pixel 6 series उपलब्ध झालेल्या आठ देशांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला नाही. आणि आता कंपनीने Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोन भारतात लाँच होणार नाहीत असे सांगितले आहे.  

Pixel 6 Series India Launch 

Google च्या प्रवक्त्यांनी एका निवेदनातून पिक्सल 6 सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. यात जागतिक मागणी आणि पुरवठा व्यवस्थेत आलेल्या समस्यांचे कारण देत आमचे फोन सर्व बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकत नाहीत. आम्ही भविष्यात आमचे पिक्सल डिवाइसेस इतर देशांमध्ये उपलब्ध करवून देण्याचा विचार करू, असे सांगण्यात आले आहे. फ्लॅगशिप पिक्सल फोन भारतात न येण्याची ही काही पहिली वेळ नाही.  

Google Pixel 6 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स 

Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुल एचडी + अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर प्रो मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. दोन्ही फोन्समध्ये कंपनीने बनवलेला Tensor चिपसेट देण्यात आला आहे. हे फोन्स Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.  

फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्सयामध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. फक्त प्रो मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर अतिरिक्त देण्यात आला आहे, जो 4x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. Pixel 6 मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे आणि 6 Pro मॉडेलमध्ये 11.1 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 4,614mAh ची बॅटरी आहे तर Pixel 6 Pro मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते.  

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान