शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

By सायली शिर्के | Updated: September 23, 2020 17:07 IST

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे.

नवी दिल्ली - ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सध्या सर्वांचाच अधिक भर असतो. त्यामुळेच गुगल पे चा वापरही हमखास केला जातो. गुगल पे चा वापर करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. "टॅप टू पे" असं या फीचरला नाव देण्यात आलं आहे. टॅप टू पे फीचर द्वारे युजर्स सोप्या पद्धतीने आपल्या कार्ड्सचा वापर करू शकणार आहेत. NFC इनेबल्ड पेमेंट टर्मिनल्स आणि ऑनलाईन मर्चेंट्स वापर करू शकतील. 

कंपनीने या नव्या फीचरसाठी Visa सोबत पार्टनरशीप देखील केली आहे. सध्या अ‍ॅक्सिस आणि एसबीआय युजर्स या फीचरचा वापर करू शकतील. तसचे कोटक आणि अन्य बँकेच्या ग्राहकांना लवकरच या सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. हे फीचर युजर्ससाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतं. तसेच आधीच्या तुलनेत सोप्या पद्धतीने कार्डचा वापर केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

गुगल पे अँड NBU इंडियाचे बिझनेस हेड सजीथ सिवानंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही आमच्या ग्राहकांना सुरक्षित अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. टोकनचा वापर हा चांगला आहे. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. कोटक आणि अन्य बँकांसोबत ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. टोकनसोबत गुगल पे ग्राहकांना एनएफसी सक्षम अँड्रॉईड डिव्हाईस किंवा फोनचा वापर करून सुरक्षित पेमेंट करण्यास मदत मिळणार आहे. या सुविधेचा लाभ 25 लाखांहून अधिक व्यापारी संस्थांना होणार आहे.'

नव्या फीचरचा असा करा वापर

नव्या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी गुगल पे अ‍ॅपवर कार्ड डिटेल्स अ‍ॅड करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेटिंग्समध्ये पेमेंट मेथडमध्ये जाऊन कार्ड अ‍ॅड करा. ओटीपी टाका. त्यानंतर कार्ड अ‍ॅक्टिवेट होईल. मग तुम्ही NFC इनेबल्ड टर्मिनल्सवर पेमेंट सर्व्हिसचा वापर करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगलने एक खास फीचर आणलं आहे. गुगलकडून Verified Calls फीचरची घोषणा करण्यात आली आहे. Google Phone अ‍ॅप्सचा हा एक भाग आहे. यामुळे तुम्हाला कोण कॉल करतंय याबाबतची माहिती मिळणार आहे. 

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

कॉल फ्रॉड्सवर लगाम लावणं हा गुगलच्या या खास फीचरमागचा मुख्य उद्देश आहे. भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्स ही मोठी समस्या आहे. तसेच Verified Calls फीचर रोलआउट करण्यासोबतच युजर्सचा यापासून बचाव होणार आहे. बिझनेस कॉलमध्ये युजर्सला कोण आणि का कॉल करत आहे हे दिसणार आहे. भारत, स्पेन, ब्राझील मेक्सिको आणि यूएससह जगभरात हे फीचर रोलआऊट केले जात आहे. सध्या TrueCaller हे अ‍ॅप युजर्सना असे फंक्शन देत आहे. Google Phone अ‍ॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा एक भाग बनणार आहे. म्हणजेच वेगळं कोणतंही अ‍ॅप यासाठी खास डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

टॅग्स :google payगुगल पेgoogleगुगलbankबँकMONEYपैसाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल