panipat painful mother sold the teenager for five lakh 60 thousand | माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

नवी दिल्ली - हरियाणाच्या पानीपतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. तब्बल पाच लाखांसाठी जन्मदात्या आईने आपल्या मुलीला विकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीचं तिच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात आलं. मात्र चाईल्ड लाईनला वेळीच या प्रकाराची माहिती मिळाल्याने मुलीची सुखरुप सुटका करण्यात यश आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका 17 वर्षीय मुलीला पाच लाख 60 हजारांत तिच्या आईने विकलं. त्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीसोबत तिचं लग्न लावण्याचा प्रकार सुरू होता. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने मुलीची सुटका करण्यात आली आहे. बाल कल्याण समितीच्या संचालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 'गावातील एका व्यक्तीने मुलीला तिच्या आईकडून काही पैसे देऊ विकत घेतलं. आणि तिचं लग्न गावातील 40 वर्षीय विक्रम याच्यासोबत लावून दिलं'

मुलीची सुखरुप सुटका करण्यात यश

'मुलीने या धक्कादायक प्रकाराची माहिती चाईल्ड लाईनला दिली. त्यानंतर हा प्रकार बाल कल्याण समिती रोहतक यांच्याजवळ पोहोचला. माहिती मिळताच बाल कल्याणची एक टीम गावात पोहोचली. त्यांनी मुलीचा शोध घेतला आणि तिची सुखरुप सुटका केली' अशी माहिती पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत आहे. मुलीला लग्न करायचं नव्हतं. मात्र कुटुंबीयांनी दबाव आणत तिला हे लग्न करायला भाग पाडल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

नात्याला काळीमा फासणारी घटना 

कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली होती. पतीने माहेरी जाण्यापासून रोखलं, जाऊ दिलं नाही म्हणून महिलेने आपल्या दोन मुलींची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला होता. चिमुकलींची गळा दाबून हत्या केल्यानंतर महिलेने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. उरईच्या छिरावली गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली. पतीने माहेरी जाण्यापासून रोखलं म्हणून महिलेने आपल्या चार वर्षीय आणि दहा महिलांच्या मुलींची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेला अटक करण्यात आली. 

महत्त्वाच्या बातम्या

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र

CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! देशात 83,347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 56 लाखांवर

"...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे करेल विरोध"

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा

English summary :
panipat painful mother sold the teenager for five lakh 60 thousand

Web Title: panipat painful mother sold the teenager for five lakh 60 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.