Google new smartphone will be launched at the moment of Rakshabandhan you can give a special gift to your sister | रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर Google चा नवीन स्मार्टफोन लाँच होणार, बहिणीला देऊ शकता खास गिफ्ट  

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर Google चा नवीन स्मार्टफोन लाँच होणार, बहिणीला देऊ शकता खास गिफ्ट  

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीला सरप्राइज द्यायचे असेल तर एक चांगली संधी आहे. गुगल लवकरच आपला नवीन पिक्सेल (Pixel) स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कंपनीने Pixel 4a चा टीझर जारी केला असून 3 ऑगस्टला लाँच होणार आहे.

टीझरमध्ये हा फोन कोणता आहे, यासंदर्भात लिहिले नाही. मात्र, जास्तकरून अशी आशा आहे की, कंपनी या दिवशी Pixel 4a लॉन्च करेल. दरम्यान, गुगलने मेमध्ये होणारी आपली आय / ओ परिषद रद्द केली होती आणि म्हणूनच या फोनचे लाँचिंग देखील पुढे ढकलले गेले.

गुगलच्या ताज्या टीझरनुसार कंपनीचा नवा स्मार्टफोन 3 ऑगस्टला बाजारात येणार आहे. यासोबतच टीझरमध्ये दमदार बॅटरी, पॉवरफुल कॅमेरा, लो लाईट कॅमेरा आणि मॅक्रो लेन्सबद्दलही माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, याचा फोटो मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे.

हा गुगलचा नेक्स्ड मिड रेंज स्मार्टफोन असेल. Pixel 4a स्मार्टफोन 5 जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. गुगलचे नवीन डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर असणार आहे. गुगल Pixel 4a भारतातील आयफोन एसई (iPhone SE) आणि वनप्लस नॉर्डशी (OnePlus Nord) स्पर्धा करेल.

स्मार्टफोनमध्ये 5.81 इंचाचा पंच होल डिस्प्ले पॅनेल देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाऊ शकतात. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये फेस स्कॅनिंगसाठी एरे कॅमेरादेखील दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या रिअर पॅनेलवर 12.2MP प्राइमरी लेन्स असेल, ती 8MPच्या सेल्फी कॅमेर्‍याच्या सपोर्टसह असतील.

गुगल Pixel 4a स्मार्टफोनला आयफोन एसई (iPhone SE) आणि वनप्लस नॉर्डपेक्षा(OnePlus Nord) कमी किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. या गुगल Pixel 4a स्मार्टफोनची किंमत 30 ते 40 हजारांच्या आत असू शकते. 

आणखी बातम्या....

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी  

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

Web Title: Google new smartphone will be launched at the moment of Rakshabandhan you can give a special gift to your sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.