डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 09:37 AM2020-08-01T09:37:02+5:302020-08-01T10:30:47+5:30

"आम्हाला तर्कवितर्क आणि अफवांवर भाष्य करण्याची इच्छा नाही, टिकटॉकच्या प्रदीर्घ यशावर आमचा विश्वास आहे."

america may be ban tik tok president donald trump said we are looking the matter | डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी 

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी 

Next
ठळक मुद्देबाईटडान्सने २०१७ मध्ये टिकटॉक लाँच केले होते.अगदी अल्पावधीतच टिकटॉक तरुणांमध्ये लोकप्रिय झाले.भारतात टिकटॉकवर यापूर्वीच बंदी घातली आहे.

कोरोना व्हायरसपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचीनवर खूप नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा माध्यमांद्वारे चीनवर निशाणा साधला असून कोरोना व्हायरस पसरवल्याबद्दल थेट आरोप केला आहे. तसेच, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एका एक्झिक्युटीव्ह आदेशासह अमेरिकेत २४ तासांनंतर टिकटॉकवर बंदी घातली जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घातली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले होते. "आमचे प्रशासनदेखील टिकटॉकवर कारवाई करण्यासाठी त्याचे मूल्यांकन करीत आहे. एक लोकप्रिय चीनी व्हिडिओ अॅप आता राष्ट्रीय सुरक्षा आणि सेन्सॉरशिपच्या मुद्द्याचे स्रोत बनले आहे," असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.

बाईटडान्स कंपनी टिकटॉकला विकण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कंपनीकडून मायक्रोसॉफ्टसोबत चर्चा सुरु आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. "आम्ही टिकटॉक पाहात आहोत. आम्ही यावरही बंदी घालू शकतो. आम्ही आणखी काहीही करू शकतो. आमच्याकडे इतरही अनेक पर्याय आहेत. बर्‍याच गोष्टी घडत आहेत. त्यामुळे आम्ही पाहणार की, काय होऊ शकते", असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अनेक विदेशी मीडिया वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बाईटडान्स लवकरच स्वतःला टिकटॉकपासून वेगळे असल्याचे जाहीर करेल. अमेरिकेच्या अनेक बड्या टेक कंपन्यांकडून आणि फायन्सशियल फर्मकडून टिकटॉक खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि फॉक्स न्यूजने शुक्रवारी सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्ट टिकटॉक विकत घेऊ शकेल आणि कंपनी याबाबत चर्चा करत आहे.

टिकटॉकने शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "आम्हाला तर्कवितर्क आणि अफवांवर भाष्य करण्याची इच्छा नाही, टिकटॉकच्या प्रदीर्घ यशावर आमचा विश्वास आहे." बाईटडान्सने २०१७ मध्ये टिकटॉक लाँच केले होते. अगदी अल्पावधीतच टिकटॉक तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. दरम्यान, भारतात टिकटॉकवर यापूर्वीच बंदी घातली आहे.

आणखी बातम्या....

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन    

Web Title: america may be ban tik tok president donald trump said we are looking the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.