Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 11:35 AM2020-08-01T11:35:27+5:302020-08-01T12:07:49+5:30

केंद्र सरकारने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली आहे.

August 5 is not a historic day, it is a black day - iltija mufti | Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम केंद्रातील मोदी सरकाने हटविले आहे. या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाने अनेक राज्यातील नेत्यांना ताब्यात घेतले होते.

श्रीनगर : आमच्यासाठी 5 ऑगस्ट हा काळा दिवस आहे, असे म्हणत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिने केंद्र सरकारवर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याठिकाणी बोलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी इल्तिजा मुफ्तीने असे विधान केले आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकारने मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैद केले आहे. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यापासून मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत आहेत.

एका वृत्तवाहिनीशी इल्तिजा मुफ्ती हिने चर्चा केली. यावेळी "आपल्यासाठी ५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस नाही. ५ ऑगस्ट हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. गृहमंत्रालयाने माझ्या आईला का कैदेत ठेवले आहे?, या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. कारण, माझ्या आईच्या मुद्द्याला नाझीर बनवायचे आहे, असा संदेश आहे. "

याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याविरोधात सामूहिक संघर्ष आवश्यक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता स्वातंत्र्य नाही, येथे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सर्व लोक तुरूंगात आहेत. वसीम बारीच्या हत्येचा पुरावा आहे की, ३७० हटवल्यामुळे दहशतवाद संपणार नाही, असे इल्तिजा मुफ्तीने म्हटले आहे. 

यापूर्वी, इल्तिजा मुफ्तीने ट्वीट केले होते की सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत, मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेची मुदत नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम केंद्रातील मोदी सरकाने हटविले आहे. या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाने अनेक राज्यातील नेत्यांना ताब्यात घेतले होते.

आणखी बातम्या....

मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी  

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

Web Title: August 5 is not a historic day, it is a black day - iltija mufti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.