Masala King Dhananjay Datar help to Many Maharashtrian Families Stranded in Dubai to Return Home | मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

ठळक मुद्देदुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार अशा कठीण परिस्थितीत देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. दुबईहून भारतातील विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते.

मुंबईः दुबईत अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरूप परत पाठवण्यासाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी 186 रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्वखर्चाने चार्टर्ड फ्लाईटने भारतात पाठवले होते. आता महिला व लहान मुले एकूण 136 महाराष्ट्रीय काल विमानाने परतले. ही कुटुंबं महाराष्ट्रातील विविध शहरे व गावांतील आहेत. 

कोविड 19 साथ व लॉकडाऊन काळात हजारो भारतीय संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) अडकून पडले होते. दुबईहून भारतातील विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते. त्यात रोजगारवंचित कामगार, विद्यार्थी, गरोदर महिला व लहान मुले यांचाही समावेश होता. खिशात पैसे नसल्याने बऱ्याच लोकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता आणि त्यांच्यापुढे रोजच्या जेवणाची समस्या होती. एकट्या महाराष्ट्रातील 65 हजारांहून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत. 

दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार अशा कठीण परिस्थितीत देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवले होते. युएई आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी कंपनी सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत जवळपास 3500 गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकिटाचा खर्च उचलून त्यांना सुखरूप भारतात रवाना केले.

त्यामध्ये केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी डॉ. दातार यांनी आतापर्यंत 3 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या ज्या गरजू व निर्धन भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी स्वतः अथवा  नातलगांमार्फत संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले आहे.

आणखी बातम्या....

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी  

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन    

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Masala King Dhananjay Datar help to Many Maharashtrian Families Stranded in Dubai to Return Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.