google bans 25 apps for stealing facebook login details removed from play store | फेसबुक पासवर्ड चोरणारे २५ अ‍ॅप्स गुगलकडून बॅन; तुम्हीही तातडीनं करा डिलीट

फेसबुक पासवर्ड चोरणारे २५ अ‍ॅप्स गुगलकडून बॅन; तुम्हीही तातडीनं करा डिलीट

मुंबई: गुगलनं जवळपास २५ अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहेत. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांचा फेसबुक लॉगइनचा तपशील चोरत असल्याची माहिती समोर आल्यानं गुगलनं हे पाऊल उचललं. एविना नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मनं याबद्दल गुगलला सतर्क केलं होतं. त्यानंतर गुगलनं तातडीनं संबंधित अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले.

प्ले स्टोरवरून हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये एक मालवेअर असतं. त्या माध्यमातून वापरकर्त्याच्या फेसबुक लॉगइन डिटेल्सची नोंद ठेवली जाते. सुरक्षेच्या दृष्टीनं हे अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत. हे २५ अ‍ॅप्स जवळपास २० लाख लोकांनी डाऊनलोड केले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप्स असल्यास ते तातडीनं डिलीट करा.

हे अ‍ॅप्स गुगलनं प्ले स्टोरवरून हटवले-
1. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स (Super Wallpapers Flashlight)- ५ लाख डाऊनलोड
2.  पेडेनटेफ (Padenatef)- ५ लाखांहून अधिक डाऊनलोड
3. वॉलपेपर लेवल (Wallpaper Level)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
4. कॉन्टूर लेवल वॉलपेपर (Contour level wallpaper)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
5. आयप्लेयर अँड आयवॉलपेपर (Iplayer & iwallpaper)- १ लाखांहून अधिक डाऊनलोड
6. व्हिडियोमेकर (Video maker)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
7. कलर वॉलपेपर्स (Color Wallpapers)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
8. पेडोमीटर (Pedometer)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड 
9. पावरफुल फ्लॅशलाइट (Powerful Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
10. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट (Super Bright Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
11. सुपर फ्लॅशलाइट (Super Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
12. सॉलिटायर गेम (Solitaire game)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड
13. एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड (Accurate scanning of QR code)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
14. क्लासिक कार्ड गेम (Classic card game)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
15. जंक फाRल क्लीनिंग (Junk file cleaning)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
16. सिंथेटिक झेड (Synthetic Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
17. फाइल मॅनेजर (File Manager)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
18. कम्पोझिट झेड (Composite Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड
19. स्क्रीनशॉट कॅप्चर (Screenshot capture) - १० हजारांहून अधिक डाऊनलोड
20. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स (Daily Horoscope Wallpapers)- जवळपास १० हजार डाऊनलोड
21. वॉक्सिया रीडर (Wuxia Reader)- जवळपास १० हजार डाऊनलोड 
22. प्लस वेदर (Plus Weather)- जवळपास १० हजार डाऊनलोड
23. एनाइम लाईव्ह वॉलपेपर (Anime Live Wallpaper)- जवळपास १० हजार डाऊनलोड
24. आय हेल्थ स्टेप काऊंटर (iHealth step counter) 
25. कॉम टाइप फिक्शन (Com type fiction)
 

Web Title: google bans 25 apps for stealing facebook login details removed from play store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.