Gemini Live! मोबाइलवर काही समजत नाहीये? जेमिनायला सांगा; पण एक गोष्ट लक्षात ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 08:22 IST2026-04-26T08:21:30+5:302026-04-26T08:22:36+5:30

Gemini फक्त तुमचे प्रश्न ऐकत नाही, तर तुम्ही काय पाहत आहात तेही समजून जास्त अचूक आणि उपयुक्त उत्तर देतो

Gemini Live! Can't understand anything on mobile? Tell Gemini; but remember one thing... | Gemini Live! मोबाइलवर काही समजत नाहीये? जेमिनायला सांगा; पण एक गोष्ट लक्षात ठेवा...

Gemini Live! मोबाइलवर काही समजत नाहीये? जेमिनायला सांगा; पण एक गोष्ट लक्षात ठेवा...

मोबाइलमध्ये एखादं सेटिंग सापडत नाही… नवीन अ‍ॅप कसं वापरायचं कळत नाही… किंवा एखादी वस्तू, मशीन, डॉक्युमेंट समजत नाही… अशा वेळी आपण गुगलवर सर्च करतो, यूट्यूब व्हिडिओ पाहतो किंवा कुणाला विचारतो. पण आता त्याचीही गरज नाही! गुगलच्या Gemini Live फीचरमुळे तुम्ही थेट तुमची स्क्रीन किंवा कॅमेरा दाखवून रिअल-टाइम मदत घेऊ शकता.

म्हणजेच जसं एखाद्या व्यक्तीला समोर बसवून विचारतो, तसंच आता AI ला दाखवून विचारता येतं! यामुळे काय प्रश्न सुटतो? सेटिंग्ज, अ‍ॅप्स किंवा टेक्निकल गोष्टी समजणे सोपे होते. वस्तू/समस्या दाखवून त्वरित मार्गदर्शन मिळते. गुगल सर्च किंवा व्हिडिओ शोधण्याचा वेळ वाचतो.

काय करायचं?
जेमिनाय अ‍ॅपमधील लाइव्ह (Gemini Live) फीचर वापरा आणि स्क्रीन किंवा कॅमेरा शेअर करून मदत घ्या.

कसे कराल?
कॅमेराद्वारे मदत घ्यायची असल्यास
१) जेमिनाय अ‍ॅप उघडा
२) ‘लाइव्ह’ पर्याय निवडा
३) कॅमेरा आयकॉनवर टॅप करा
४) ज्या वस्तूबद्दल विचारायचं आहे ती दाखवा
५) प्रश्न विचारा... लगेच उत्तर मिळेल
उदाहरण : तुटलेली वस्तू, सेटअप, कपडे, डिव्हाइस
स्क्रीन शेअर करून मदत घ्यायची असल्यास
१) ज्या स्क्रीनबद्दल प्रश्न आहे ती उघडा
२) Gemini सुरू करा (लाँग प्रेस / अ‍ॅप)
३) ‘Share screen with Live’ निवडा
४) स्क्रीन दाखवून प्रश्न विचारा

उदाहरण : सेटिंग्ज, वेबसाइट, फोटो निवड, अ‍ॅप वापर

महत्त्वाची सूचना
कॅमेरा किंवा स्क्रीन शेअर करताना खासगी माहिती (पासवर्ड, बँक तपशील, वैयक्तिक डेटा) दाखवू नका.

लक्षात ठेवा
Gemini फक्त तुमचे प्रश्न ऐकत नाही, तर तुम्ही काय पाहत आहात तेही समजून जास्त अचूक आणि उपयुक्त उत्तर देतो. म्हणजेच AI आता “पाहून” मदत करणाऱ्या टप्प्यावर पोहोचलं आहे!

Web Title : Gemini Live: स्क्रीन दिखाकर मोबाइल पर मदद पाएं, लेकिन सावधान रहें!

Web Summary : फोन पर अटके हैं? Gemini Live स्क्रीन या कैमरा शेयरिंग के माध्यम से रीयल-टाइम मदद प्रदान करता है। तकनीकी मुद्दों को हल करें, तुरंत मार्गदर्शन प्राप्त करें और समय बचाएं। अपनी निजी जानकारी सुरक्षित रखें।

Web Title : Gemini Live: Get mobile help by showing your screen, but be careful!

Web Summary : Stuck on your phone? Gemini Live offers real-time help via screen or camera sharing. Solve technical issues, get instant guidance, and save time. Remember to protect your private information.