कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:38 IST2025-10-10T16:35:28+5:302025-10-10T16:38:10+5:30
Flipkart Sale: टीव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा फ्लिपकार्टचा दिवाळी धमाका सेल एक उत्तम संधी आहे.

कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
टीव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा फ्लिपकार्टचा दिवाळी धमाका सेल एक उत्तम संधी आहे. या सेलमध्ये, ५५ इंचाचा ४K LED स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. तर, ४३ इंचाचा आणि ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या किमतीतही मोठी कपात करण्यात आली. टीव्ही खरेदीवर बँक डिस्काउंट, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.
TCL च्या सब-ब्रँड iFFALCON चा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त २२ हजार ९९९ रुपयांत घरी आणू शकता. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ७३ हजार ९९० रुपये आहे, जो आता ६८ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्डवरून खरेदी केल्यास तुम्ही ५ टक्के कॅशबॅक देखील मिळवू शकता.
हा iFFALCON स्मार्ट टीव्ही गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि त्यात ५५ इंचाचा अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन स्क्रीन आहे. या स्मार्ट टीव्हीची स्क्रीन ३८४० x २१६० पिक्सेल रिझोल्यूशनला ६०Hz रिफ्रेश रेटसह सपोर्ट करते. हे ४K HDR ला सपोर्ट करते आणि त्यात डॉल्बी व्हिजन, MEMC आणि डायनॅमिक कलर एन्हांसमेंटची वैशिष्ट्ये आहेत.
या स्मार्ट टीव्हीमध्ये तीन HDMI आणि एक USB पोर्ट आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये LAN, WiFi, Bluetooth आणि सॅटेलाइट केबलचा समावेश आहे. हा स्मार्ट टीव्ही AiPQ Pro प्रोसेसरवर चालतो. टीव्हीच्या स्क्रीनमध्ये मेटॅलिक फ्रेम आणि अत्यंत पातळ बेझल आहेत. हे Netflix, JioHotstar, Prime Video, YouTube आणि Zee5 सारख्या प्री-इंस्टॉल केलेल्या अॅप्ससह येते. रिमोटमध्ये Google असिस्टंट बटण देखील आहे.
हा स्मार्ट टीव्ही 24W आउटपुट साउंडला सपोर्ट करतो आणि डॉल्बी ऑडिओची सुविधा देतो. कंपनीने या टीव्हीमध्ये चार स्पीकर दिले आहेत, जे एक इमर्सिव्ह साउंड अनुभव देतात. iFFALCON चा ४३-इंच स्मार्ट टीव्ही फक्त १५,९९९ मध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही ५० हजार ९९० मध्ये उपलब्ध आहे. त्याच्या खरेदीवर तुम्हाला ६८ टक्के सूट देखील मिळू शकते.