facebook testing facial recognition technology to verify your identity | भन्नाट! Facebook वर नवं फीचर येणार, चेहऱ्याने अकाऊंट व्हेरिफाय होणार
भन्नाट! Facebook वर नवं फीचर येणार, चेहऱ्याने अकाऊंट व्हेरिफाय होणार

ठळक मुद्देफेसबुक आता आपल्या युजरला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखणार आहे. युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी ही आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुक फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करण्याची तयारी करत आहे.फेसबुक फीचरवर रिसर्च करणाऱ्या वॉन्गने या फीचरची माहिती दिली.

नवी दिल्ली - फेसबुक सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. असंच एक भन्नाट फीचर फेसबुकने आपल्या युजर्सने आणलं आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक आता आपल्या युजरला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखणार आहे. म्हणजेच युजर्सना लवकरच चेहऱ्याने अकाऊंट व्हेरिफाय करता येणार आहे. अ‍ॅप रिवर्स इंजिनिअर जेन मॉनचन वॉग्नने दिेलेल्या एका रिपोर्टनुसार, युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी ही आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुक फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करण्याची तयारी करत आहे.

फेसबुकवर अनेक दिवसांपासून फेक अकाऊंट हटवण्यासाठी मोहीम सुरू आहे. अनेकदा काही लोक इतर व्यक्तींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करतात. तसेच त्यांच्या अकाऊंटवरून चुकीच्या गोष्टी पोस्ट करतात. आतापर्यंत फेसबुक अशा समस्या या अल्गोरिदम फिल्टरिंग आणि मॅन्युअल पद्धतीने सोडवत होते. मात्र तरीही फेक प्रोफाईलच्या समस्येचा सामना हा करावा लागत आहे. फेसबुकवर सर्वात जास्त फेक अकाऊंट हे लोकप्रिय व्यक्ती आणि सेलिब्रिटीजचे असतात. मोबाईल अ‍ॅपसाठी खास हे फीचर तयार केले जात आहे. 

फेक अकाऊंटच्या समस्येचा सामना करण्यासाठी फेसबुकने मोबाईल अ‍ॅपसाठी फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करत आहे. या सिस्टमच्या मदतीने युजर्सचा चेहरा स्कॅन केला जाईल त्यानंतर ते अकाऊंट स्वत: चं आहे की नाही याबाबत माहिती मिळेल. फेसबुक फीचरवर रिसर्च करणाऱ्या वॉन्गने या फीचरची माहिती दिली आहे. फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. एका खास उद्देशाने कंपनीने हा नवा लोगो लाँच केला आहे. 

फेसबुकच्या या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्लिश अक्षरं ही कॅपिटलमध्ये दिसणार आहेत. मात्र हा बदललेला लोगो फेसबुक अ‍ॅप किंवा फेसबुक वेबवर दिसणार नाही. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे. फ्लॅट FACEBOOK हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिण्यात आले आहे. हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून फेसबुकच्या इतर प्रोडक्टला दर्शवत असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी म्हणून हा स्वतः चा नवा लोगो प्रसिद्ध केला असल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकच्या अंतर्गत फेसबुक अ‍ॅप, मॅसेंजर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, ओकुलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा यांचा समावेश होतो. 

फेसबुकच्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहीत आहेत का? 

मस्तच! न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार फेसबुक

फेसबुक लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे. युजर्सना आता फेसबुकवर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे. या न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगाभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकमध्ये लवकरच एक न्यूज टॅबचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. न्यूज सेक्शन या नव्या सर्व्हिससाठी फेसबुक न्यूज प्रोव्हाईड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरून न्यूज सेक्शन सुरू करण्यासाठी प्रमुख मीडिया हाऊसशी चर्चा सुरू केली आहे. यामध्ये न्यूयॉर्क पोस्ट, वॉशिंग्टन पोस्ट, समाचार कॉर्प सारख्या मीडिया हाऊस आणि पब्लिकेशन्स आहेत.
 

Web Title: facebook testing facial recognition technology to verify your identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.