इलॉन मस्क आणणार Twitter पेक्षा जबराट App; फेसबुक आणि इन्स्टाग्रामचाही वाट लावणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:42 IST2022-03-28T21:41:53+5:302022-03-28T21:42:22+5:30
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया अॅप्लिकेशनवर काम करत असल्याची मोठी माहिती दिली आहे.

इलॉन मस्क आणणार Twitter पेक्षा जबराट App; फेसबुक आणि इन्स्टाग्रामचाही वाट लावणार!
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया अॅप्लिकेशनवर काम करत असल्याची मोठी माहिती दिली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर हे 'फ्री स्पीच प्रिन्सिपल'च्या तत्त्वांचं पालन करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे ट्विटरला पर्याय आणू इच्छित असल्याचं मस्क यांनी ट्विट केलं आहे. "ट्विटर एक वास्तविकरित्या सार्वजनिक माध्यम आहे आणि फ्री स्पीचच्या तत्त्वांचं पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे", असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात, टेस्ला आणि स्पेसएक्सने देखील याच संदर्भात एक ट्विट केलं होतं. "लोकशाहीसाठी फ्रीडम ऑफ स्पीच अतिशय महत्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वाचं काटेकोरपणं पालन करतं का?", असा प्रश्न युझर्सना विचारला होता. मस्क यांना आता एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करायचा आहे जिथं यूझर्स त्यांना हवं ते लिहू शकतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म- सोशल ट्रुथ लॉन्च करण्यामागील कारण देखील तेच आहे. हे गेल्या महिन्यात iOS वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आले होतं. हे सध्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ट्विटर, फेसबुक आणि इतर अनेक सोशल अॅप्सनं बंदी घातल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
मस्क यांनी नवं सोशल मीडिया व्यासपीठ विकसित करावं असं वाटत नाही. त्यांनी ट्विटर विकत घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. टेस्लाच्या सीईओंच्या ट्विटवर टिप्पणी करताना, अनेक यूझर्सनं मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे.