शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विजया गड्डेंवरून मस्क अडचणीत? 1 अब्ज डॉलर्सचा दंड होणार; ते ट्विट भोवणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:44 IST

Elon Musk यांचा Twitter सोबत ठरलेला सौदा मस्क यांच्या ट्विट्समुळे धोक्यात येऊ शकतो. हा सौदा रद्द झाल्यास इलॉन मस्क यांना दंड भरावा लागेल.

Elon Musk यांनी Twitter यांच्यातील सौदा अजून पूर्णत्वास गेलेला नाही. सध्या हे कॉन्टॅक्ट लॉक्ड आहे आणि पूर्ण होण्यास काही महिने जाऊ शकतात. परंतु आता हा करार इलॉन मस्क यांच्या ट्विट्समुळे रद्द होऊ शकतो आणि त्याचा मोठा फटका टेस्लाच्या सीईओना बसू शकतो. विशेष म्हणजे इलॉन मस्क यांनी याआधी देखील अशीच एक कंपनी विकत घेण्याचा करार रद्द केला होता.  

काय आहे प्रकरण  

इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात झालेल्या कराराचे काही नियम ठरवण्यात आले आहेत. या नियमांमुळे मस्क यांच्यावर काही बंधन घालण्यात आली आहेत. त्यानुसार टेस्लाचे सीईओ या मर्जर बाबत ट्विट करू शकतात. परंतु ट्विटरच्या प्रतिनिधीची मस्करी करू शकत नाहीत. परंतु नेमकी हीच चूक मस्क यांनी आपल्या 26 एप्रिलच्या ट्विटमधून केली आहे.  

इलॉन यांनी Vijaya Gadde या ट्विटरच्या टॉप अ‍ॅडव्होकेटना लक्ष्य केलं आहे. ट्विटर मस्क यांच्या हातात जात असल्यामुळे लीगल आणि पॉलिसीच्या टीमच्या मिटिंगमध्ये विजया गड्डे रडू लागल्या. तेव्हा इलॉन यांनी त्यांच्या जुन्या निर्णयांची आठवण करून दिली. त्यांनी सस्पेंड केलेल्या न्यूज वेबसाईटची आठवण ट्विटमधून करून दिली आहे.  

ट्विट न करण्याच्या अ‍ॅग्रीमेंटवर सही करून देखील मस्क यांना मोह आवरला नाही. याचा याचा परिणाम त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर होऊ शकतो. यूएस सिक्योरिटी एक्सचेंजने ठरवून दिलेल्या नियमांच भंग झाल्यामुळे मस्क याना 1 बिलियन डॉलरचा दंड भरावा लागेल.  

याआधी देखील केली आहे चूक  

न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, चार वर्षांपूर्वी देखील मस्क यांनी अशी चूक केली आहे. त्यांनी See’s Candies ला टक्कर देण्यासाठी कँडी कंपनी उघडण्याची घोषणा केली होती. परंतु नंतर त्यांनी यातून माघार घेतली होती. अशाप्रकारे ट्विटरचा सौदा देखील ते रद्द करू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर