मार्क झुकरबर्गच्या तीन वाईट सवयी ज्यामुळे लोक Facebook सोडताहेत; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:00 PM2022-09-13T15:00:58+5:302022-09-13T15:01:47+5:30

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फेलो बिल जॉर्ज यांनी 'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर मोठे आरोप केले आहेत.

bad bosses habits mark zuckerberg why employees leaving facebook harvard expert | मार्क झुकरबर्गच्या तीन वाईट सवयी ज्यामुळे लोक Facebook सोडताहेत; तज्ज्ञांचा दावा

मार्क झुकरबर्गच्या तीन वाईट सवयी ज्यामुळे लोक Facebook सोडताहेत; तज्ज्ञांचा दावा

Next

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फेलो बिल जॉर्ज यांनी 'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. जॉर्ज यांच्या दाव्यानुसार कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॉसच्या पाच वाईट सवयी आढळतील आणि झुकरबर्ग त्यापैकी एक बॉस आहे. ते म्हणाले की झुकरबर्गकडे नेतृत्व क्षमता कमी आहे आणि तो वारंवार आपल्या निर्णयांनी META ला डबघाईला आणण्याचं काम करत आहे. झुकरबर्गमुळे लोक कंपनी सोडत आहेत. जॉर्जच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत झुकरबर्ग 'मेटा'चा सीईओ राहील तोपर्यंत कंपनी अपयशी ठरत राहील.

हार्वर्ड फेल आणि मेडिकल टेक्नोलॉजी कंपनी Medtronic चे माजी सीईओ जॉर्ज यांच्या दाव्यानुसार META यापुढील काळातही अपयशीच ठरत राहील. "मला वाटतं जोपर्यंत मार्क झुकरबर्ग मेटामध्ये सीईओ आहे तोपर्यंत फेसबुक चांगलं काम करू शकणार नाही. लोकांचा कंपनीबद्दल भ्रमनिरास होण्यामागे झुकरबर्ग हेच एक कारण आहे. तो खरोखरच भरकटला आहे'', असं बिल जॉर्ज यांनी त्यांच्या True North: Leading Authentically in Today's Workplace, Emerging Leader Edition या पुस्तकात म्हटलं आहे.

1. Rationalizing Mistakes: चुका मान्य न करणे
कामापेक्षा स्टाईलवर जास्त भर देणारे कर्मचारी मार्क झुकरबर्ग कामावर ठेवतात, असा आरोप जॉर्ज यांनी केला आहे. तसंच तो चुकांची जबाबदारी घेऊन तो त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करत नाही. उदाहरण देताना, जॉर्ज यांनी एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. जेव्हा 'मेटा'ने बाजार मूल्य फेब्रुवारीमध्ये 232 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गमावलं तेव्हा झुकरबर्गने या अपयशाचं खापर अॅपलच्या गोपनीयतेवर आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मच्या आव्हानांवर फोडलं.

2. Resistant to Counsel: सल्ला घेण्यास नकार देणे
झुकरबर्गची एक विशेष गोष्ट म्हणजे तो एकटं राहणं पसंत करतो आणि इतरांचा सल्ला घेण्यास नकार देतो. त्याच्यावर कुणी टीका केली किंवा प्रतिक्रिया दिली तरी तो ती सकारात्मकतेनं घेत नाही, असंही जॉर्ज यांनी म्हटलं आहे. तसंच  त्याच्या जवळच्या व्यक्तीनं उद्भवणाऱ्या धोक्यांचा इशारा दिला तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे. उदाहरणार्थ, रॉजर मैनामी या फेसबुकच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारानं त्याला Facebook वर डेटा गोळा करण्याबद्दल आणि लोकांना टार्गेट करण्याबद्दल इशारा दिला होता. तेव्हा झुकरबर्गनं त्यांचं ऐकलं नाही. 

3. Glory Seeker: ग्राहकांपेक्षा नफ्याला प्राधान्य देणे
जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, झुकरबर्गची आणखी एक वाईट सवय आहे, ज्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे. तो संपत्तीच्या मागे धावणारा व्यक्ती आहे. तो त्याच्या ग्राहकांपेक्षा वाढ आणि नफा याला प्राधान्य देतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या तपासणीत इन्स्टाग्राम या 'मेटा'च्याच सोशल मीडिया अॅपमधून मुलींना मानसिक त्रास होत असल्याचं आढळून आलं. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपन्यांनी अशा समस्या सोडवण्यास सुरुवात केली असताना, कंपनीनं नैतिक जबाबदारी टाळली आहे.

Web Title: bad bosses habits mark zuckerberg why employees leaving facebook harvard expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.