लवकरच येणार Apple चा सर्वात स्वस्त Macbook; यात मिळणार iPhone चे प्रोसेसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:18 IST2025-07-01T17:17:37+5:302025-07-01T17:18:12+5:30
Apple च्या iPhone प्रमाणे Macbook ची पण खूप क्रेझ आहे.

लवकरच येणार Apple चा सर्वात स्वस्त Macbook; यात मिळणार iPhone चे प्रोसेसर
Apple च्या iPhone प्रमाणे Macbook ची पण तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. अनेकांची Macbook घेण्याची इच्छा असते, परंतू याच्या किमतीमुळे ते घेऊ शकत नाही. पण, आता तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. अॅपल लवकरच तुमच्यासाठी स्वस्त मॅकबुक मॉडेल लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपलचा आगामी मॅकबूक सध्याच्या मॅकबूक एअर सारखाच कॉम्पॅक्ट साईजमध्ये येईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीएफ इंटरनॅशनल सिक्युरिटीज विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आगामी मॉडेलच्या काही खास फिचर्सबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, नवीन अॅपल मॅकबूकमध्ये १३ इंचाची स्क्रीनस स्पीड आणि चांगल्या मल्टीटास्किंगसाठी फ्लॅगशिप आयफोनचा ए१८ प्रो प्रोसेसर वापरला जाईल.
उत्पादन कधी सुरू होईल?
आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्येही हाच चिपसेट वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर कंपनीच्या एआय फीचर्सना सपोर्ट करण्यास सक्षम असून, याद्वारे ग्राहकांना कंपनीच्या आगामी लॅपटॉपमध्येही एआय फीचर्सचा फायदा मिळू शकतो. दरम्यान, कंपनीचा नवीन स्वस्त मॅकबूक २०२५ च्या चौथ्या तिमाहीत किंवा २०२६ च्या पहिल्या तिमाहीत येऊ शकतो.