धक्कादायक! लोकांच्या शारीरिक संबंधावेळी केल्या जाणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करत होता Apple Siri

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 03:54 PM2019-08-27T15:54:40+5:302019-08-27T15:58:46+5:30

Apple चा व्हर्चुअल असिस्टंट सीरी फोन यूजर्स शारीरिक संबंधावेळी जे बोललात ते रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे.

Apple third party contractors used to hear siri users recording | धक्कादायक! लोकांच्या शारीरिक संबंधावेळी केल्या जाणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करत होता Apple Siri

धक्कादायक! लोकांच्या शारीरिक संबंधावेळी केल्या जाणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करत होता Apple Siri

Next

(Image Credit : evoke.ie)

Apple चा व्हर्चुअल असिस्टंट सीरी फोन यूजर्स शारीरिक संबंधावेळी जे बोललात ते रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या यूजर्सच्या या गोष्टी Apple चे थर्ड पार्टी कर्मचारी ऐकायचे आणि सोबतच रेकॉर्डही करायचे. गेल्या काही दिवसांपूर्वी गुगल, अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅपलचे व्हर्चुअल असिस्टंट चुकीच्या कारणांमुळे चर्चेत होते. या कंपन्यांवर आरोप लावण्यात आला होता की, या कंपन्यांकडून ठेवण्यात आलेले थर्ड पार्टी कर्मचारी यूजर्सच्या ऑडिओ क्लिप ऐकत होते. या प्रकरणाची गंभीरता आणि यूजर्सची प्रायव्हसी ध्यानात घेऊन कंपनीने ३००० थर्ड पार्टी कर्मचारी काढून टाकले होते. हे कर्मचारी एका शिफ्टमध्ये हजारो रेकॉर्डिंग्स ऐकत होते.  

पश्चिम आयरलंडच्या कॉर्क शहरात अ‍ॅपल कॉन्ट्रॅक्टर्स यूजर्सच्या खाजगी गोष्टी ऐकत होते. यात कपल्सच्या शारीरिक संबंधावेळीच्या गोष्टींचाही समावेश होता. इतकेच नाही तर असेही सांगितले जात होते की, अ‍ॅपलचे थर्ड पार्टी कर्मचारी सीरीच्या माध्यमातून संवेदनशील बिझनेस डील आणि ड्रग्स डील्स सुद्धा ऐकत होते.

यूजरची ओळख ठेवायचे गुपित

Irish Examiner च्या रिपोर्टनुसार, थर्ड पार्टी कर्मचारी सीरीच्या रेकॉर्डिंग ऐकून त्यांची ग्रेडिंग करत होते, जेणेकरून सीरीची व्हॉईस कमांड समजून घेण्याची क्षमता आणखी केली जाऊ शकेल. या प्रकरणी एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, 'आम्ही यूजर्सची ओळख गोपनिय ठेवायचो. या रेकॉर्डिंग्स काही सेकंदाच्याच असायच्या. कधी-कधी आम्ही पर्सनल डेटा आणि खाजगी गोष्टीही ऐकतो होतो. पण यात जास्तीत जास्त सीरीला दिल्या जाणाऱ्या कंमाडच असायच्या.

याबाबत एका सूत्राने  The Guardian ला माहिती दिल्यावर या विषयाकडे गंभीरतेने बघितलं गेलं. सध्याचे अ‍ॅपलचे थर्ड पार्टी कर्मचारी सीरी यूजर्सच्या पर्सनल गोष्टी ऐकण्यासोबतच त्या रेकॉर्डही करत होते. यात यूजर्सची मेडिकल माहिती, बिजनेस डील, ड्रग्स डील आणि यूजर्सच्या शारीरिक संबंधावेळी केल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे.

यूजर्सला नाही याची कल्पना

यात सर्वात आश्चर्यकारक बाब ही आहे की, अ‍ॅपलच्या यूजर्सना याबाबत काहीच माहिती नाही. याबाबत जेव्हा अ‍ॅपलला माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गेल्या महिन्यात सीरी रेकॉर्डिंगने केले जाणारे ट्रान्सक्रिप्शन आणि ग्रेडिंगची कामे थांबवली.

अ‍ॅपलने त्यांच्या जाहीर केलेल्या अधिकृत स्पष्टीकरणात सांगितले की, ते यूजर्सच्या प्रायव्हसीला प्राथमिकता देतात. त्यामुळे त्यांना ट्रान्स्क्रिप्शनचं काम सध्या थांबवलं आहे. कंपनीने सांगितले की, ही सेवा पुन्हा सुरू करण्याआधी चांगल्याप्रकारे चेक करतील. जेणेकरून यूजर्सच्या प्रायव्हसीचं धोका राहणार नाही.

 

Web Title: Apple third party contractors used to hear siri users recording

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.