लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:10 PM2022-02-14T17:10:28+5:302022-02-14T17:10:48+5:30

5G Spectrum Auction: गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक 5G सेवांच्या प्रतीक्षेत आहेत. आता लवकर ग्राहकांची प्रतीक्षा संपणार आहेत.

5g spectrum auction in india expected in may 2022 trai dot services will start in few upcoming months know details | लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत

लवकरच 5G ची प्रतीक्षा संपणार; पुढील काही दिवसांमध्ये होणार स्पेक्ट्रम लिलाव, TRAI चे संकेत

Next

5G Spectrum Auction: भारतात लवकरच 5G सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रायनुसार (TRAI) या वर्षी मे महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. तसंच यासाठी ट्रायला मार्च महिन्यापर्यंत सेल प्रोसेससाठी नियमांवर आपल्या सूचना द्यावा लागणार आहे. एका बड्या टेलिकॉम ऑपरेटनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दरम्यान, मार्च महिन्यापर्यंत ट्राय आपल्या सूचना सबमिट करेल अशी माहिती दूरसंचार मंत्री अश्वनी वैष्णव यांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच दिली होती. ट्राय आणि दूरसंचार विभाग एकत्र मिळून काम करणाक आहेत. तसंच यामुळे लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू करण्यास मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 

केव्हापर्यंत 5G सेवा?
ट्रायनं आपल्या सूचना मार्च महिन्यापर्यंत पाठवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आम्हाला निर्णय घेण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं टेलिकॉम सेक्रेटरी के. राजारामन यांच्या हवाल्यानं दिली आहे. दरम्यान, ट्रायकडून सूचना मिळाल्याच्या जवळपास ६० ते १२० दिवसानंतरच लिलावाची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू केली जाते. 

ट्रायकडून सूचना मिळाल्यावर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागतो, असंही राजारामन म्हणाले. दूरसंचार विभागानुसार 5G सेवा सुरू झाल्यानंतर युझर्सना 4G च्या तुलनेत १० पट अधिक स्पीड मिळतो. प्रक्रियेनुसार दूरसंचार विभाग सध्या ट्रायच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.

ट्राय काय सूचना देणार?
ट्राय आपल्या सूचनांमध्ये स्पेक्ट्रमची किंमत, स्पेक्ट्रम वाटपाची पद्धत, ब्लॉक साईज, पेमेंटच्या टर्म कंडिशन्स याशिवाय अन्य सूचना देण्याची शक्यता आहे. ट्राय या क्षेत्रातील आणि अन्य स्टेक होल्डर्सशी चर्चा केल्यानंतर आपल्या सूचना दूरसंचार विभागाला पाठवणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या प्रक्रियेनुसार दूरसंचार विभागात Digital Communications Commission ट्रायच्या सूचनेवर आपला निर्णय घेतली आणि अखेरच्या मंजुरीसाठी तो प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवतील.

Web Title: 5g spectrum auction in india expected in may 2022 trai dot services will start in few upcoming months know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.