१८.३ कोटी ई-मेल पासवर्डची चोरी; जीमेल खात्यांनाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:26 IST2025-10-31T12:26:28+5:302025-10-31T12:26:45+5:30
तुमचा पासवर्ड चोरी झाला असेल, तर त्वरित तो बदला व अकाउंटमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा

१८.३ कोटी ई-मेल पासवर्डची चोरी; जीमेल खात्यांनाही धोका
नवी दिल्ली : जगभरातील १८.३ कोटींहून अधिक ई-मेल अकाउंट्सच्या पासवर्डची चोरी झाल्याची माहिती समोर आली असून, यात जीमेल अकाउंट्सचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी संशोधक संस्था 'ट्रॉय हंट'ने या मोठ्या डेटा चोरीचा पर्दाफाश केला आहे. सुमारे ३.५ टेराबाइट डेटा चोरीला गेल्याचे संस्थेने म्हटले आहे.
तुमचा पासवर्ड चोरी झाला असेल, तर त्वरित तो बदला व अकाउंटमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा, असा सल्ला वापरकर्त्यांना देण्यात आला आहे. ही डेटाचोरी 'इन्फोस्टीलर' मालवेअरद्वारे करण्यात आली. गूगलने मात्र सांगितले की, जीमेल हॅक झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत; पण, वापरकर्त्यांनी मजबूत पासवर्ड ठेवावा.