सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अक्कलकोट तालुक्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान ठाकरे गटाच्या तीन जिल्हा परिषद उमेदवार आणि एक पंचायत समिती उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरवण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून ठाकरे गटाच्या निवडणूक रणनीतीला खिंडार पडले आहे.
नेमकी काय आहे स्थिती?ठाकरे गटाने अक्कलकोट तालुक्यात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार केला होता. तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि तीन पंचायत समिती गणांमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या छाननीत खालील ठिकाणचे अर्ज बाद झाले आहेत:
जिल्हा परिषद गट: सलगर, चपळगाव आणि जेऊर.
राजकीय परिणाम आणि चुरसअक्कलकोटमध्ये शिवसेना ठाकरे गटाची थेट लढत भाजप (आमदार सचिन कल्याणशेट्टी गट) आणि शिवसेना शिंदे गटाशी होणे अपेक्षित होते. मात्र, महत्त्वाच्या चार जागांवरून ठाकरे गटाचे उमेदवार बाहेर पडल्याने आता या जागांवर तिरंगी किंवा चौरंगी लढतीऐवजी महायुती आणि इतर अपक्ष किंवा छोट्या पक्षांमध्ये सामना होण्याची चिन्हे आहेत.
Web Summary : Akkalkot: In Solapur, the Thackeray group faced a setback as four nominations for local elections were rejected due to technical reasons. This reshapes the political landscape, impacting the group's election strategy and potentially leading to multi-cornered contests against BJP and Shinde factions.
Web Summary : सोलापुर: अक्कलकोट में ठाकरे गुट को स्थानीय चुनावों में झटका लगा, तकनीकी कारणों से चार नामांकन रद्द हुए। इससे राजनीतिक परिदृश्य बदल गया है, गुट की चुनाव रणनीति प्रभावित हुई है और भाजपा और शिंदे गुट के खिलाफ बहुकोणीय मुकाबले की संभावना है।