निंबोणी येथे युवकाचा खून संशयितांना अटक

By Admin | Updated: June 22, 2014 00:45 IST2014-06-22T00:45:38+5:302014-06-22T00:45:38+5:30

एका युवकाचा खून

The youth arrested on the Nimbony murder suspects | निंबोणी येथे युवकाचा खून संशयितांना अटक

निंबोणी येथे युवकाचा खून संशयितांना अटक


मंगळवेढा : मुलीस पळवून नेल्याचा राग मनात धरून एका युवकाचा खून केल्याप्रकरणी हिरालाल घोडके, साधू घोडके, महादू घोडके, चंद्रकांत घोडके (सर्व निंबोणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सचिन भारत कांबळे (वय २३) असे मयताचे नाव आहे.
सचिन कांबळे याने मुलीस पळवून नेले होते. याचा राग मनात धरून वरील चौघांनी संगनमत करून २० जूनच्या रात्री निंबोणी शिवारात भारत ढगे यांच्या वस्तीजवळ अज्ञात हत्याराने डोक्यावर वार करून ठार केले. मयताचे वडील भारत कांबळे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपास पो.नि. दिलीप पाटील करीत आहेत.

Web Title: The youth arrested on the Nimbony murder suspects