धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव; गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 13:05 IST2024-01-07T13:04:06+5:302024-01-07T13:05:33+5:30
पडळकर पुढे म्हणाले, "आपण गावगाड्यात बॅनर लावता गाव बंदी, आमच्या आरक्षणात अतिक्रमण, तिकडे दलितांना वाळीत टाकणे, इकडे नेत्यांना येऊ द्यायचे नाही. ही संविधानाची पायमल्ली आहे,"

धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव; गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला
लक्ष्मिकांत बेर्डे यांचा एक पिक्चर होता. त्यात एक बाहुला होता. लक्ष्मिकांत ज्या पद्धतीने तार ओढेल तो त्या पद्धतीने बोलायचा. आता या महाराष्ट्रात आरक्षणाच्या निमित्ताने अनेक अर्धवटराव तयार झाले आहेत, असा खोचक टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणाऱ्यांना लगवला आहे. ते शनिवारी पंढरपूर येथे झालेल्या सभेत बोलत होते.
पडळकर म्हणाले, "ते म्हणतायत की, धनगर आणि वंजारी समाजाचा ओबीसी आरणाशी काही संबंध नाही. हे लोक भजबळांमागे उगाच फिरत आहेत. ओबीसीमध्ये धनगर आणि वंजारी समाजाचे वेगळे आरक्षण आहे. अरे बाबांनो महाराष्ट्रता स्थानिक स्वराज्य संस्थेत जे आरक्षण आहे. ते धनगर आणि वंजारी समाजाला ओबीसीतूनच आहे. एवढेच नाही, तर केंद्राचे शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण आहे. तेही ओबीसीमधूनच आहे. आमची मागणी वेगळी होती, आम्हाला एनटीमध्ये टाकले. आम्ही ओबीसीच्या या संपूर्ण विषयात संपूर्ण ताकदीने भुजबळ यांच्यासोबत आहोत. चिंता करायची गरज नाही."
यावेळी भुजबळांचे नाव घेत पडळकर म्हणाले, "हा योद्धा जपला पाहिजे. महाराष्ट्रातील ३४६ जातींच्या ओबीसींच्या समुहावर आक्रमण होत आहे. यामुळे आपल्याला गप्प बसता येणार नाही. त्यांनी केवळ (छगण भुजबळ) भूमिकाच घेतली नाही. तर ती वैचारिक भूमिका आहे. भुजबळ यांच्या आंदोलनाला विचाराचे अधिष्टान आहे. आज आपण येते एका विचारनानेच गोळा झाला आहात. जे आमच्या हक्काचे आहे. त्यावर कुणीही अतिक्रमण करता कामा नये अशी आमची भूमिका आहे."
पडळकर पुढे म्हणाले, "आपण गावगाड्यात बॅनर लावता गाव बंदी, आमच्या आरक्षणात अतिक्रमण, तिकडे दलितांना वाळीत टाकणे, इकडे नेत्यांना येऊ द्यायचे नाही. ही संविधानाची पायमल्ली आहे," असेही पडळकर यावेळी म्हणाले. आता जरांगे यावर काय उत्तर देतात ते पाहणे महत्वाचं ठरणारेल!