शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सांत्वन करायला कुणीबी येतं.. मदत करायची म्हंटल्यावर मायबाप सरकार बी मागं सरकतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:27 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची कैफियत; जिल्हाधिकाºयांकडे मदत करण्यासाठी विनंती

ठळक मुद्देविजापूर रोड परिसरातील प्रार्थना फाउंडेशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची बैठकप्रार्थना फाउंडेशनतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेआमच्या घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला

सोलापूर : शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली बुडतो. त्याच्यापुढं आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय राहात नाही. आत्महत्या केल्यावर अनेकजण सांत्वन करण्यासाठी येतात. पण प्रत्यक्षात मदतीची वेळ आल्यावर माणसं काय सरकार पण मागे सरकते, अशी कैफियत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी बैठकीत मांडली.

विजापूर रोड परिसरातील प्रार्थना फाउंडेशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर उपाय काय करायचे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

प्रार्थना फाउंडेशनतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात त्यांच्या मागण्या नोंदविण्यात आल्या. यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला योग्यतेनुसार शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना पक्के घर देण्यात यावे. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणे, वीज कनेक्शन देण्यात यावे. लघुउद्योग व शेती व्यवसायासाठी मागणीनुसार त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांना विधवा पेन्शन तत्काळ चालू करण्यात यावी. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात यावी. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सर्वांना ग्रामपंचायतीच्या मदतीने शेततळे मिळवून देण्यात यावे. आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण व स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला रिक्षा परमिट द्यावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना विहीर देण्यात यावी.

कांद्याला जरा भाव मिळाला की लोकांच्या पोटात दुखतं- मागील काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांच्या पदरात काही पैसे पडत आहेत. हे पाहून अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. कांदा महाग झाला की खूप मोठं संकट आल्यासारखे लोक वागतात; मात्र मोठे दुकाने, मॉलमधून सांगेल त्या किमतीने वस्तू खरेदी करतात. शेतकरी खूप कष्ट करतात तेव्हा कुठे दोनवेळच्या खाण्याची सोय होते. शेतकºयांची परिस्थिती वाईट असते, त्याला दोन पैसे मिळावेत अशी भावना शहरी लोक ांमध्ये यायला हवी, अशी अपेक्षा एका शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलेने व्यक्त केली.

कागदपत्रे नसल्याचे सांगून सवलती नाकारल्या- आमच्या घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. यातील मोजक्याच जणांनी प्रत्यक्षात मदत केली. सरकारने देखील पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र हे देखील त्यांनी पूर्ण केले नाही. आमच्या घरात वीज नाही, बँका कर्ज देत नाहीत, सरकारी सवलत मागण्यास गेलो तर कागदपत्राचे नाव सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी केला. आम्ही अशिक्षित असल्यामुळे शासनाने सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करता येत नाही. याचा विचार करुन शासनाने फक्त आधारकार्डावरच सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी विनंती यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSuicideआत्महत्याagricultureशेती