शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

मतदानादिवशी सोलापूर, माढा मतदारसंघातील ५२ गावातील आठवडा बाजार बंद राहणार

By appasaheb.patil | Published: April 12, 2019 1:52 PM

सोलापूर लोकसभेसाठी गुरूवार १८ तर माढा लोकसभेसाठी मंगळवार २३ एप्रिल रोजी होणार मतदान

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघात १० मार्च रोजीपासून आचारसंहिता सुरू करण्यात आली जिल्ह्यातील ५२ गावातील आठवडी बाजार तात्पुरता बंद ठेवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलाकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी घेतला निर्णय

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़  मतदानादिवशी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील ५२ गावातील आठवडी बाजार तात्पुरता बंद ठेवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी दिला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात १० मार्च रोजीपासून आचारसंहिता सुरू करण्यात आली़ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांकडून मतदानादिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना देण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार १८ एप्रिल रोजी व माढा लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने जिल्ह्यातील आठवडी बाजार भरवू नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

या गावातील आठवडा बाजार बंद असणार - बीबीदारफळ (उत्तर सोलापूर), मुस्ती, आहेरवाडी (दक्षिण सोलापूर). कडबगाव स्टेशन, काझीकणबस, तडवळ  (अक्कलकोट)़ खर्डी, शेटफळ, रांझणी, बोहाळी, पंढरपूर, भंडीशेगाव, शेळवे, करोळे, नांदोरे, आंबे, खरसोळी,  (पंढरपूर)़ मंगळवेढा, पाटखळ, भोसे, हुन्नूर, रड्डे, बोराळे, सिद्धापूर, मरवडे, निंबोणी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, शिरसी, गोणेवाडी, नंदेश्वर, लवंगी, हुलजंती, सलगर बु, (ता़ मंगळवेढा)़ कटफळ, महिम, वाकीशिवणे, उदनवाडी, सोनंद, पाचेगाव बु, बलवडी, य़ मंगेवाडी, वाकी घेरडी (ता़ सांगोला)़ बेंबळे, पिलीव, रोपळे (क)़ अनगर, घोडेश्वर, खंडाळी (ता़ मोहोळ), वरकुटे, सालसे (ता़ करमाळा) या बाजारांचा बंदमध्ये  सामावेश असणार आहे. बाजार बंद असल्याने व्यापारी आणि ग्राहकांना मतदान करणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार