शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सोलापूर जिल्ह्यातील २१७ गावे अन् १४२५ वाड्यांवर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 1:01 PM

झळा टंचाईच्या : पावणेपाच लाख लोकांची तहान भागतेय २४१ टँकरच्या पाण्यावर

ठळक मुद्देटँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चपारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार ९0९ लोकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागत आहे. २४१ गावे तर १ हजार ४२५ वाड्यांना टँकरच्या पाण्याचा मोठा आधार झाला आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यात १२ टँकर सुरू असून, ११ गावांतील ३५ हजार ९७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बार्शी तालुक्यात १0 टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व एका वाडीवरील १६ हजार ८0८ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय ४२ खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करून टंचाई गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

दक्षिण सोलापूर तालुक्यात २२ टँकर सुरू करण्यात आले असून, १३ गावांतील ५८ हजार ५0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १९ विंधन विहीर व विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यात ११ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावांतील १६ हजार ८0६ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. २0 विंधन विहीर व विहिरीचेही पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

माढा तालुक्यात १७ टँकर सुरू करण्यात आले असून, १४ गावे व २९ वाड्यांवरील ४१ हजार २७६ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय १४ विंधन विहिरी व विहीरही पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यात ४३ टँकर सुरू असून, ४३ गावे व ३३९ वाड्यांवरील ८८ हजार ८५७ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय १0 विंधन विहीर व विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

मोहोळ तालुक्यात १२ टँकर सुरू करण्यात आले असून, ११ गावे व ७४ वाड्यांवरील २५ हजार ५९0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय २ विहीर व विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यात ५५ टँकर सुरू करण्यात आले असून, ४७ गावे व ५२३ वाड्यांवरील ८३ हजार ६00 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

सांगोला तालुक्यात ४८ टँकर सुरू करण्यात आले असून, ४३ गावे व ३२३ वाड्यांतील ६५ हजार २३२ लोकांना पाणीपुरवठा होत आहे. माळशिरस तालुक्यात ११ टँकर सुरू असून, १३ गावे व १३६ वाड्यांवरील ३0 हजार २६४ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

टँकर फेºयांच्या तपासणीसाठी पथके - दुष्काळी परिस्थितीमुळे रोज टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. टँकरच्या पाण्यावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याने यात पारदर्शकता व नियंत्रण आणण्यासाठी टँकरवर जीपीएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टँकर गेला कोठे, थांबला कुठे याची माहिती अधिकाºयांना कार्यालयात बसून मिळत आहे. याशिवाय टँकरच्या खेपा व गावातील वस्तुस्थिती याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय