चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ, पंढरपूरातील अनेक मंदिरे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:15 IST2018-08-24T12:12:46+5:302018-08-24T12:15:16+5:30

चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ, पंढरपूरातील अनेक मंदिरे पाण्याखाली
सोलापूर : वीर, भटगर हे सातारा जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरले आहेत़ अतिरिक्त झालेले पाणी नीरा नदीव्दारे १३ हजार क्युसेसने भिमा नदीत सोडण्यात आल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शुक्रवारी कुंडलिक मंदीरासह अन्य मंदीरे व समाधी पाण्याखाली गेली आहेत.
नदीकाठच्या गावातील शेतकºयांमध्ये पाईप, मोटार, विद्युत पंप बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहेत़ सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे़ शिवाय या जिल्ह्यातील भाटघर, देवधर व वीर ही धरणे १०० टक्के भरली आहेत़ त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीतपाणी सोडण्यास सुरुवात केली़ ते पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने नदीपात्रा वाढ झाली आहे़ परिणामी चंद्रभागा वाळवंटातील भीमाशंकर मंदिर, भक्त पुंडलिक मंदिरासह अन्य मंदिर व समाधी यांना वेढा घेतला आहे
नदीकाठच्या शेतकºयांना फायदा
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी या पाण्याचा लाभ होणार आहे़ पावसाअभावी आणि नदी पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांतील ऊस लागवडी व कांदा लागवड रखडली होती़ मात्र भीमा नदीत पाणी आल्याचे कळताच आता ऊस, कांदा लागवडींना वेग येणार आहे़ शिवाय चालू वर्षी कारखान्याला जाणाºया उसालाही याचा फायदा होणार आहे़