शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:35 PM

मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्दे पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागलेभविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो

अशोक कांबळे

मोहोळ : ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. दीड महिन्यात ३ मीटरने पाणी पातळी कमी झाली असून, उरलेला पाणीसाठा केवळ  २० दिवस पुरेल, एवढाच उरला आहे.

चालूवर्षी तालुक्यासह शहर परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागले आहेत. भविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे.  अशा परिस्थितीत ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. बंधाºयात पाणी राहिले तरच शहराला पाणी मिळणार, अशी अवस्था शहराची आहे.

उजनी धरणातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले होते. पाणी संथगतीने पोहोचले होते. बंधारा चार मीटरने भरला होता. परिसरातील वीजपुरवठा खंडितही केला आहे, परंतु चोरुन व सिंगल फेज लाईनवर चालणारे नवीन विद्युत पंप सर्वांकडे असल्याने नदी परिसरात रात्रंदिवस पाणी उपसा सुरु आहे. याकडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. यामुळे बंधाºयातील पाणी दीड महिन्यातच तीन मीटरने कमी झाले आहे. आजमितीला एक मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले असून ते केवळ २० दिवस पुरेल इतकेच आहे.

मुख्याधिकारी म्हणतात, निवडणुकीमुळे दुर्लक्ष- याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,  मागील महिनाभरात महसूल विभागाने निवडणुकीसाठी नगरपरिषदेची सर्वच यंत्रणा गुंतविल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष झाले. याशिवाय वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याबाबत सहकार्य केले नाही. पाटबंधारे विभागाची ही कसलीच मदत मिळाली नसल्याने ही पाणी पातळी घटल्याचे ते म्हणाले. शिल्लक राहिलेल्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करून हे पाणी पुरविण्याबाबत तातडीने उपाय योजना  करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सीना नदीद्वारे ५ मार्च २०१९ दरम्यान कोळेगाव बंधाºयात पाणी पोहोचले होते. चार मीटर क्षमतेने बंधारा भरून देण्याचे आम्ही काम केले आहे .- वाय.व्ही. पाटील कालवा निरीक्षक, पाटबंधारे विभाग, मोहोळ

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ