शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

शाळा, कॉलेजच्या ठिकाणी मुलींना त्रास देणाºया मजनूंची होणार धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:38 PM

शहर पोलीस अलर्ट : छेड काढणाºया रोडरोमिआेंवर ‘दामिनी’ची करडी नजर

ठळक मुद्देरोडरोमिओंचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तत्काळ पोलीस आयुक्तालयाच्या १०० नंबरवर किंवा ०२१७-२७४४६०० वर संपर्क साधा.पोलीस काही मिनिटात तुमच्या पर्यंत पोहोचतील. वेळीच रोडरोमिओंच्या अपवृत्तीला आळा घाला, अन्यथा भविष्यात त्याचे वेगळे परिणाम भोगावे लागतात

संताजी शिंदे 

सोलापूर : शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळा, कॉलेज आणि बाजारपेठांच्या ठिकाणी मुली व महिलांची छेडछाड करणाºया रोडरोमिओंवर पोलीस आयुक्तालयाच्या ‘दामिनी’ पथकाची करडी नजर असणार आहे. पाठीमागे लागणे, छेड काढणे आदी प्रकाराबाबत तक्रार आल्यास अशा मजनूंची जबरदस्त धुलाई होणार आहे. मुली व महिलांनी याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन दामिनी पथकाच्या वतीने करण्यात आले आहे. 

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण सात पोलीस ठाणे आहेत. फौजदार चावडी पोलीस स्टेशन, जेलरोड पोलीस स्टेशन, सदर बझार पोलीस स्टेशन, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सलगर वस्ती पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन या हद्दीत ठिकठिकाणी मुला-मुलींची, काही ठिकाणी फक्त मुलींच्या शाळा, कॉलेज, होस्टेल व कोचिंग क्लासेस आहेत. २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. सध्या शहरातील शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थिनी जात आहेत.

शहरातील काही शाळांसमोर रोडरोमिओंचे टोळके उभे राहते. मुलींची छेड काढणे, कॉमेंट करणे, पाठलाग करणे आदी प्रकार घडत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी दामिनी पथकाची खास नेमणूक करण्यात आली आहे. 

आठ मोटरसायकलीवर १६ दामिनीचे पथक शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत आहेत. एखाद्या शाळेजवळ किंवा कॉलेजच्या आसपास छेडछाड होत असेल तर तेथील रोडरोमिओंना हुसकावून लावले जाते. गरजेनुसार तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याचा पोलीस फोर्स बोलावून रोडरोमिओंची धुलाई केली जाते. शाळेसाठी व अन्य कामासाठी बाहेर पडणाºया मुली व महिलांसाठी हे पथक सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शहरातून गस्त घालत आहेत. प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये पथक जाऊन संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिनींना भेटून मार्गदर्शन करीत आहेत.

 रोडरोमिओंचा त्रास होत असेल तर अन्याय सहन न करता पोलिसांना संपर्क साधण्यास सांगत आहेत. 

आम्ही तुमच्यासोबत आहोत : हर्षा कांबळे- आज आपण २१ व्या शतकात आहोत, मुलगी आहात धाडस कसं करायचं असा विचार करून अन्याय सहन करू नका. रोडरोमिओंचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तत्काळ पोलीस आयुक्तालयाच्या १०० नंबरवर किंवा ०२१७-२७४४६०० वर संपर्क साधा. पोलीस काही मिनिटात तुमच्या पर्यंत पोहोचतील. वेळीच रोडरोमिओंच्या अपवृत्तीला आळा घाला, अन्यथा भविष्यात त्याचे वेगळे परिणाम भोगावे लागतात. मुलींनो धाडसी व्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहन दामिनी पथकाच्या प्रमुख फौजदार हर्षा कांबळे यांनी केले आहे. 

मुलींनी अन्यायाचा विरोध केला पाहिजे, भीती बाळगून गप्प बसणे हा त्यावर उपाय नाही. शिक्षक, मुख्याध्यापकांना आपली समस्या सांगावी, अन्यथा आयुक्तालयाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी. पोलिसांचे दामिनी पथक संबंधितांचा बंदोबस्त करतील.-प्रेसनजीत दुपारगुडे, पोलीस निरीक्षक, महिला तक्रार समस्या निवारण केंद्र

विविध शाळा, महाविद्यालयांच्या गेटसमोर रोडरोमियांचा धिंगाणा चाललेला असतो. त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. शाळा-कॉलेज भरताना, सुटताना गेटसमोर आणि परिसरात पोलिसांची गस्त असावी. पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाल्याशिवाय हे रोडरोमिओ सुधारणार नाहीत.-राज पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र वीरशैव युवक आघाडी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणlady donलेडी डॉन