वाकीशिवणेत चंदनाची लाकडे घेऊन जाणारी दुचाकी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:20 IST2021-01-22T04:20:46+5:302021-01-22T04:20:46+5:30

गुरुवारी पहाटे ३.३०च्या सुमारास सांगोला तालुक्यात वाकी शिवणे येथे एस.टी. स्टँड परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलीस शिपाई ...

In Wakishivan, a two-wheeler carrying sandalwood was caught | वाकीशिवणेत चंदनाची लाकडे घेऊन जाणारी दुचाकी पकडली

वाकीशिवणेत चंदनाची लाकडे घेऊन जाणारी दुचाकी पकडली

गुरुवारी पहाटे ३.३०च्या सुमारास सांगोला तालुक्यात वाकी शिवणे येथे एस.टी. स्टँड परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलीस शिपाई बाबासाहेब पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय गुजर गायकवाड, पांडुरंग शिवाजी भजनावळे (दोघेही रा. हलदहिवडी), शंकर दत्तात्रय मासाळ आणि जोगिंदर युवराज सिंग (दोघेही रा. शिरभावी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरील चौघांनी चंदनाच्या झाडाचा लाकडी ओंडका तोडला. तो दुचाकीवरून विक्री करायला घेऊन निघाले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली होती. त्यांनी गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास वाकी शिवणे एस.टी. बसस्थानकाच्या परिसरात सापळा रचला. पोलिसांनी विनाक्रमांकाची दुचाकी पकडली. यावेळी त्यांनी १५ किलो चंदन असा जवळपास ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

Web Title: In Wakishivan, a two-wheeler carrying sandalwood was caught