शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

शासन स्तरावरील मागण्यांसाठी सोलापूरात प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 7:21 PM

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शासन स्तरावरील विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा कडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्दे १७ प्राथमिक शिक्षक संघटना व ५ खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र जिल्ह्याच्या  कानाकोपºयातील सुमारे दहा हजार शिक्षक या मोर्चात सहभागी शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक सर्व गट तट बाजूला सारून सहभागी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ४ :  सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शासन स्तरावरील विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा कडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.        सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १७ प्राथमिक शिक्षक संघटना व ५ खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर मोर्चा काढला. या मोचार्ची सुरुवात चार हुतात्मा पुतळ्यापासून झाली. डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिरासमोरून  जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर मोचार्चे सभेत रूपांतराने शेवट झाले. सर्व संघटना प्रमुखांनी आपापले विचार व्यक्त करून शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले.        गुरुनानक जयंतीनिमित्त राजपत्रित सुट्टी असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक नेत्यांनी मोचार्साठी सुट्टीचा दिवस निवडला हे या मोचार्चे वैशिष्ट होते. सुट्टीचा दिवस असताना जिल्ह्याच्या  कानाकोपºयातील सुमारे दहा हजार शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते. मागील सहा महिन्यातील बदल्यांच्या गोंधळामुळे "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" सारखा कार्यक्रम मागे पडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर  त्रुट्या स्पष्ट दिसत असूनही हा कार्यक्रम पुढे रेटण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.यामुळे शिक्षकांच्या ऐक्याला देखील बाधा येत असून "फोडा, झोडा आणि राज्य करा" ही नीती यामध्ये प्रकषार्ने दिसून येत आहे. जुनी पेन्शन मागणी प्रलंबित असताना पुन्हा त्याच वर्गावर अत्यंत अन्यायकारक असा २३ /१०/२०१७ चा शासन निर्णय लादला गेला. या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या मोचार्चे आयोजन करण्यात आले होते.मोर्चामध्ये या २३ आॅक्टोबर चा  वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी बाबतचा काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा. शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाईन कामे रद्द करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी. १ नोव्हेंबर नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळालीच पाहिजे परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून २/०२/२०१७  च्या शासन निर्णयात आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करून ह्या बदल्या  शैक्षणिक वर्ष अखेरच करण्यात यावे.एम.एस.सी.आय.टी. संगणक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ देऊन वेतनवाढ वसुली थांबवावी व शिक्षकांचा पगार दरमहा एक तारखेलाच द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या.या मोर्चेत शिक्षक आमदार शिवाजी सावंत व आमदार भारत नाना भालके, रिपब्लिकन पार्टी चे अशोक सरवदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीर्चे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी या मोर्चेत सामिल होऊन या आंदोलनात पाठींबा दिलायावेळी आ. भारत भालके यांनी सदर बदलीचा जीआ रद्द  करण्यासाठी जूनी पेन्शन योजनेबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले. आ. शिवाजी सावंत यांनी शासन सुविधा, सोयी न देता कामाची अपेक्षा करून शिक्षकांना त्रास देत असल्याने येथून शिक्षक गप्प बसणार नसल्याचे आपल्या भाषणात सांगितले व या नंतरचा लढा आणखी तीव्र करण्याचे आवाहन केले. या मोचार्चे नेतृत्व सर्व संघटनेच्या प्रमुखांनी केले असल्याने शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक सर्व गट तट बाजूला सारून सहभागी झाल्याचे निदर्शनास आले.         या मोर्चामध्ये सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष अंकुश काळे , मागासवर्गीय शिक्षकं संघाचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ, राज्य संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, आदिंचे यावेळी भाषणे झाली.सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघाचे अध्यक्ष विद्याधर भालशंकर, सोलापूर जिल्हा एकल प्राथमिक शिक्षक मंचचे अध्यक्ष इकबाल नदाफ, सोलापूर जिल्हा बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष सुधीर कांबळे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे बाबासाहेब ढगे, मागासवर्गीय शिक्षक व  शिक्षकेत्तर  कर्मचारी  संघटनेचे अध्यक्ष दिनेश क्षीरसागर, अल्पसंख्यांक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष  एजाज शेख, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अरुण नागणे, अपंग शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष नवनाथ धांडोरे, पदवीधर  संघटनेचे सरचिटणीस राम बिराजदार, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अ.रहीम शेख, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल कोरे, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दावल नदाफ, वसंतराव नाईक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, खाजगी उर्दू संघटनेचे अध्यक्ष अ.गफुर अरब, शिक्षक सेनेचे अध्यक्ष मुरलीधर कडलासकर महिला शिक्षक आघाडीच्या चंदाराणी आतकर, युवक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर याबाजी व पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुनिल चव्हाण आदींनी या मोचेर्चे नेतृत्व केले.         जिल्हा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल काळे, वीरभद्र यादवाड, सूर्यकांत हत्तुरे-डोगे, अनिल कादे, सुरेश पवार, दयानंद कवडे, अनिरुद्ध पवार, अशोक पोमाजी,उत्तमराव जमदाडे, दिपक काळे, सिद्धाराम सुतार,दादाराजे देशमुख, लिंबराज जाधव, राजाभाऊ यादव, संभाजी फुले, संजय सावंत, महेश कांबळे, नामदेव वसेकर, अप्पासाहेब देशमुख, बब्रुवान काशीद, महावीर वसेकर, अप्पाराव इटेकर, अप्पासाहेब देशमुख, ज्योतीराम भोंगे, ताटे बनकर, विनोद आगलावे,रमेश शिंदे, विकास घोडके, ज्ञानेश्वर चटे, राजन सावंत, बाळासाहेब काशीद, करवीर कडलास्कर बाळासाहेब गोरे, कल्लप्पा फुलारी,संजय सरडे रावसाहेब जाधवर, सिद्धेश्वर धसाडे, सिद्राम कटगेरी, रेवणासिध्द हत्तूरे, अमोगसिद्ध कोळी, कृष्णा हिरेमठ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.