Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:54 IST2025-10-07T13:52:44+5:302025-10-07T13:54:03+5:30
Pandharpur Crime News: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
Pune News Latest: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या पंढरपुरात आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात तरुणांनी आधी दगड मारले. त्यानंतर भाविकांना बेदम मारहाण केली. यात काही भाविकांचे डोकी फुटली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातून ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप पंढरपूरला दर्शनासाठी आला होता. मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजता ते विठ्ठल मंदिर परिसरात होते. त्याचवेळी ही मारहाणीची घटना घडली.
भाविकांना मारहाण का, काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांचा ग्रुप विठ्ठल मंदिर परिसरात उभा होता. यावेळी एकजण धक्का मारून गेला. त्यामुळे ग्रुपमधील एकाने विचारले की, असे का केले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी त्यांना दगड मारायला सुरूवात केली. काहींना दगड लागले आणि डोकी फुटली. त्यानंतर तरुणांच्या गटाने भाविकांना लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली.
या घटनेमुळे मंदिर परिसरात पहाटेच गोंधळ उडाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. जखमी भाविकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंढरपुरात अज्ञात तरुणांकडून वारकरी भक्तांना मारहाण pic.twitter.com/SgywtPcjfb
— News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2025
या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस हल्ला करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.