शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी तीन वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात झाले ४३.५१ टक्के मतदान

By appasaheb.patil | Updated: October 21, 2019 16:25 IST

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड

ठळक मुद्दे- विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू- बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी लावल्या रांगाच रांगा- चारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३.५१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे़ करमाळा, सांगोला, माळशिरशस मतदारसंघात मतदान चुरशीने सुरू आहे तर माढा, मोहोळ, बार्शीत मतदान संथगतीने सुरू आहे. उरलेल्या तीन तासात मतदान जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

११ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. सततधार पावसामुळे सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी प्रमाणात होती़ मात्र अकरा वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला अन ् मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती़ दुपारी चारपर्यंत ४३.५१ टक्के मतदान झाले़ उरलेल्या तीन तासात आणखीन मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल असा विश्वास जिल्हा निवडणुक कार्यालयाने व्यक्त केला आहे. दुपारी तीनच्या सुमारास शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अशोक चौकातील माणेकरी प्रशालेतील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने महिलांनी थोडा गोंधळ केला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले.

------------------------------------------------------------------------जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के झाले मतदान पहा...

  • करमाळा - ४९.०७
  • माढा - ४५़०४
  • बार्शी - ४७.०२
  • मोहोळ - ४५.०५
  • सोलापूर शहर उत्तर - ३५.१३
  • सोलापूर शहर मध्य - ३५.४९
  • अक्कलकोट - ४३.०५
  • सोलापूर दक्षिण - ३७.२५
  • पंढरपूर - ४२.०३
  • सांगोला - ४९.१७
  • माळशिरस - ४८.६८

 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदानsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य