शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांसाठी अनोखी हवाई सफर

By admin | Updated: November 5, 2014 15:10 IST

'काय रे तू हवेत आहेस'! होय, खरंच मी हवेत आहे ! अद्वीप फ्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ-ईस्टच्या फ्लाईंग फेस्टिव्हलचा आज पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी हवाई सफरीचा आनंद लुटला.

सोलापूर : 'काय रे तू हवेत आहेस'! होय, खरंच मी हवेत आहे ! अद्वीप फ्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ-ईस्टच्या फ्लाईंग फेस्टिव्हलचा आज पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी हवाई सफरीचा आनंद लुटला. सोलापूर विमानतळावर ९ नोव्हेंबरपर्यंत फ्लाईंग फेस्टिव्हल चालणार आहे. 

आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पद्मश्री विजेत्या शीतल महाजन, डॉ. शिरीष वळसंगकर, डॉ. व्यंकटेश मेतन, चव्हाण मोटार्सचे घनश्याम चव्हाण, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले, विमानतळाचे प्रमुख श्रीवास्तव, डॉ. लब्बा आदींच्या उपस्थितीत आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून फेस्टिव्हलचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी गेडाम, मनपा आयुक्त गुडेवार, पोलीस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांनी आपल्या मुलांसमवेत हवाई सफर केली. 
पक्षी आकाशात उडताना मुलांना त्याचे खूप आकर्षण असते. आकाशात उडण्याचा एक वेगळा आनंद त्यांना असतो. आज खर्‍या अर्थाने त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे डॉ. गेडाम म्हणाले. सोलापूरचे पर्यटन व्यापक करण्यासाठी अशा महोत्सवाची गरज असल्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले. राकेश उदगिरी यांनी महोत्सवाची संकल्पना मांडली तर पद्मश्री विजेत्या शीतल महाजन यांनी पॅराशूटचे हवेतील वेगवेगळे प्रकार उपस्थितांसमोर मांडले. प्रारंभी पवन मोंढे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी प्लाईंग फेस्टिव्हल सोलापूरकरांसाठी नवा असून, महोत्सवाच्या माध्यमातून हवेत उडण्याचा आनंद घेण्याचे नमूद केले. सूत्रसंचालन अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले तर भास्कर मोरे यांनी आभार मानले. यावेळी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, संतोष बायस, डॉ. सिद्धेश्‍वर वाले, संतोष बुरबुरे, नागेश शेंडगे, संजय अँड्सचे संजय तोडकरी, नंदकिशोर हबीब, वैभव होमकर, दीपक चिंता, अंजली तिवारी, बाळकृष्ण लाड, सोमेश्‍वर याबाजी आदी उपस्थित होते.
-------
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या भाषणात मनपा आयुक्तांकडे पाहत 'यानंतर तुम्ही-आम्ही हवाई सफर करणार आहोत. हवाई सफरीचा आनंद जरूर घ्या, मात्र वेगळे विचार मनात आणून कुठे किती घरे आहेत, हे पाहू नका', असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.