उज्ज्वला शिंदेचे नेट परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:42+5:302020-12-05T04:48:42+5:30

मंगळवेढा : यूजीसीच्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत उज्ज्वला बाळू शिंदे उत्तीर्ण झाल्या. मराठी विषयातून त्यांनी ही परीक्षा दिली ...

Ujjwala Shinde's success in net exam | उज्ज्वला शिंदेचे नेट परीक्षेत यश

उज्ज्वला शिंदेचे नेट परीक्षेत यश

मंगळवेढा : यूजीसीच्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत उज्ज्वला बाळू शिंदे उत्तीर्ण झाल्या. मराठी विषयातून त्यांनी ही परीक्षा दिली आहे. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए. मराठी या अभ्यासक्रमात २०१९ मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. प्राचार्य प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मराठी विषयात पीएच.डी. संशोधन करीत आहेत. संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढाचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. बी. पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. औदुंबर जाधव, प्रा. राजकुमार पवार, प्रा. दत्ता सरगर, प्राचार्य, प्रा. डॉ. के. एच. शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम राठोड, प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रा. डॉ. दत्ता डांगे, प्रा. सुभाष कदम, डॉ. प्रा. नागेश झांबरे यांनी शिंदे यांच्या यशाचे कौतुक केले.

--

फोटो : ०४ उज्ज्वला शिंदे

---

फोटो : ०४ उज्ज्वला सोरटे

Web Title: Ujjwala Shinde's success in net exam