ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून चार जणांचा मृत्यू; सोलापूर-अक्कलकोट रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 20:35 IST2021-12-23T20:34:55+5:302021-12-23T20:35:16+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून चार जणांचा मृत्यू; सोलापूर-अक्कलकोट रोडवरील घटना
सोलापूर : सोलापूर अक्कलकोट रोड वरील सादूल पेट्रोल पंपासमोर असलेल्या रस्ते कामामधील ड्रेनेजमध्ये पडून चौघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर अक्कलकोट या चार पदरी रोडचे काम सध्या सुरू आहे. चार पदरी रोड मुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत, मात्र हे काम करताना कोणतीही खबरदारी संबंधित मक्तेदार अथवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली नसल्याचे पाहायला मिळतं. त्याठिकाणी कोणतेही झाकणं झाकणं लावली गेली नाहीत. रस्त्याला लागून असल्याने ती धोकादायक अवस्थेत आहेत.
गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या ड्रेनेजमध्ये चार जण पडले हे पाहता आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला बराच शर्थीचे प्रयत्न करून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र त्यांची परिस्थिती गंभीर आहे.