डंपरच्या धडकेत दोघे जखमी; आठ वर्षाचा बालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:24 IST2020-03-09T19:20:54+5:302020-03-09T19:24:47+5:30
सोलापुरातील घटना; उलटलेला टेम्पो पडला माय-लेकराच्या अंगावर

डंपरच्या धडकेत दोघे जखमी; आठ वर्षाचा बालक गंभीर
सोलापूर: महाराणा झोपडपट्टी समोरील रस्त्यावरून राहत्या घराकडे जात असताना डंपरने दिलेल्या धडकेत उलटलेला छोटा हत्ती टेम्पो अंगावर पडल्याने आई व मुलगा दोघे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी अकरा वाजता घडला.
हाफिस सज्जाद मुजावर (वय-8), हसीना सज्जाद मुजावर(वय 25 दोघे रा. मोदीखाना सोलापूर) असे जखमी झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.
हसीना मुजावर ही मुलगा हाफिस याला शाळेतून घेऊन घरी जात होती. दोघे महाराणा झोपडपट्टी समोरील रस्त्यावर आल्या असता. जवळून चार चाकी छोटा हत्ती हा टेम्पो जात होता. अचानक पाठीमागून येणाऱ्या डंपरने छोटा हत्ती टेम्पोला धडक दिली. धडकेत टेम्पो उलटला मात्र तो ऑफिस व हसीना या दोन माय लेकरांच्या अंगावर पडला.
टेम्पो अंगार पडल्याने दोघे मायलेकरे गंभीर झाल्याने दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलगा हापिस हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डंपर चालकाचा पाठलाग करून नागरिकांनी पकडले
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता तो पळून जात होता त्यामुळे लोकांनी डंपर चालकाचा पाठलाग केला. पाटलाकडून डंपर चालकाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.