‘व्हीआयपीं’साठी दोन हेलिपॅड तयार

By Admin | Updated: July 8, 2014 01:16 IST2014-07-08T01:16:57+5:302014-07-08T01:16:57+5:30

शासकीय पूजा; मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री राहणार उपस्थित

Two helipad ready for 'VIP' | ‘व्हीआयपीं’साठी दोन हेलिपॅड तयार

‘व्हीआयपीं’साठी दोन हेलिपॅड तयार


जगन्नाथ हुक्केरी ल्ल पंढरपूर
‘पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरिचे दास जन्म घेती।’ या संत वचनाप्रमाणे पंढरीची ओढ जसी वारकऱ्यांना लागली त्याचपद्धतीने शासकीय महापूजेचे वेध मुख्यमंत्र्यांना लागले असून, पंढरीचा राणा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री व सहकार मंत्री मंगळवारी दुपारी पंढरीत येणार असून, यासाठी उपविभागीय कृषी कार्यालयाच्या आवारात दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.
आषाढी सोहळ््याला शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असून, कार्तिकीला उपमुख्यमंत्री महापूजा करतात. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी दुपारपर्यंत पंढरीत दाखल होणे अपेक्षित असून, त्यांच्याबरोबर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल हेही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी पंढरपूर—कराड रस्त्यावरील उपविभागीय कृषी कार्यालयाच्या आवारात दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. त्यांचा येण्याचा मार्ग अद्याप निश्चित नसला तरी प्रशासकीय नियोजन मात्र करण्यात आले आहे. याशिवाय मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आ. बबनराव पाचपुते, विविध पक्षाचे प्रदेशचे पदाधिकारीही पंढरीला हजेरी लावून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. यामुळे पक्षाचे पदाधिकारी त्यांचे नियोजन करण्यात व्यस्त आहेत.
मुख्यमंत्री पंढरीत आल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याबरोबरच आ. भारत भालके यांच्या निवासस्थानी अल्पोपहार घेणार असून, आषाढी एकादशीदिवशी कल्याणराव काळे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे. आषाढी वारीत काँग्रेस कार्यकर्त्यांना मेळाव्याद्वारे मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची प्रथा असल्याने याचेही नियोजन करण्यात येत आहे.
--------------------------
गोहत्या बंदीवर होईल निर्णय?
गोहत्यावर बंदी घालण्यासाठी बंडातात्या कराडकर हे शिवाजी चौकात आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा दिला असून, ते पर्यायी मार्गाने शासकीय पूजा करण्यासाठी गेल्यास आम्ही त्यांना विरोध करणार नाही, असाही त्यांनी पवित्रा घेतला आहे. यामुळे मुख्यमंत्री बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेल्या गोहत्या बंदी कायद्याबाबत काही तरी निर्णय घेतील का, याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आह

Web Title: Two helipad ready for 'VIP'