मालट्रकचालकाला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:33+5:302020-12-05T04:41:33+5:30

सोलापूर : सोलापुरातील मार्केट यार्डसमोरील नो एण्ट्रीच्या रांगेत थांबलेल्या ट्रकचालकाला बेदम मारहाण करून लुटल्याप्रकरणी, अज्ञात चौघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ...

The truck driver was beaten and robbed | मालट्रकचालकाला मारहाण करून लुटले

मालट्रकचालकाला मारहाण करून लुटले

सोलापूर : सोलापुरातील मार्केट यार्डसमोरील नो एण्ट्रीच्या रांगेत थांबलेल्या ट्रकचालकाला बेदम मारहाण करून लुटल्याप्रकरणी, अज्ञात चौघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. शिवानंद भीमाशंकर डुंणगे (वय २२ रा. निम्बर्गी, ता. दक्षिण सोलापूर) हा चालक मालट्रक चिंचोळी एमआयडीसी येथून सोयाबीन घेऊन कर्नाटक येथे जाण्यासाठी निघाला होता. मालट्रक घेऊन तो मार्केट यार्ड समोर नो एन्ट्रीच्या रांगेत थांबला होता. दरम्यान, अज्ञात चौघे तेथे आले, केबिनजवळ येऊन शिवानंद डुंणगे यांना खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. खिशातील अडीच हजार रुपये व १० हजाराचा मोबाइल काढून घेतला व तेथून निघून गेले.

Web Title: The truck driver was beaten and robbed