शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी लॉबिंग करून गुळाचे दर पाडले

By admin | Updated: November 19, 2014 23:36 IST

निमित्त अवकाळी पावसाचे : शेतकऱ्यांना प्रति अडीच क्विंटलला २३४० रुपये तोटा

प्रकाश पाटील - कोपार्डे -अवकाळी पावसाचे निमित्त पुढे करून व्यापाऱ्यांनी बाजार समितीत गुळाचा दर पाडण्याचा फंडा अवलंबला असून, आता शेतकऱ्यांच्या कमी प्रतीच्या गुळाला २६००, तर उच्च प्रतीच्या गुळाला ३२०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. गुळाला मिळणारा प्रति क्विंटल दर व त्याचा उत्पादन खर्च याचा मेळ घालताना शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस येत आहे. एखाद्या शेतकऱ्यास दुसऱ्याच्या गुऱ्हाळात आपला ऊस गाळपासाठी द्यावयाचा झाल्यास गुऱ्हाळघरांचे एका रात्रीचे भाडे (चार आदणे) सध्या दहा हजार ते १२ हजारपर्यंत मोजावे लागतात. एवढेच नाही, तर यावर एक क्विंटल (१०० किलो) गूळही द्यावा लागतो. यानंतर तयार झालेला गूळ बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पोहोचविण्यापासून तो विक्री होईपर्यंत प्रत्येक स्तरावर शेतकऱ्याची पिळवणूकच केली जाते. यात अडत कमिशन तीन टक्के, तोलाई, हमाली यांचा समावेश होतो.एवढेच नाही तर बाजार समितीत हा गूळ गेल्यानंतर जो सौदा काढण्याची पद्धत आहे ती अजबच आहे. एकाच क्षेत्रातील गाळप केलेल्या उसाच्या गुळातून वेगवेगळी कलमे काढली जातात. एवढेच नव्हे तर आदणात तयार झालेल्या गुळाची प्रत व्यापाऱ्यांच्या मर्जीने ठरविली जाते. काहीवेळा ही प्रतदेखील व्यापारी नव्हे, तर हमाल ठरवितात. ही चीड आणणारी प्रथा वर्षानुवर्षे चालू आहे.आजही व्यापाऱ्यांकडून बदली रवे काढण्याची प्रथा सुरू आहे. सौदे काढताना बाजार समितीत उतरलेल्या गुळाच्या थप्पीवरून पायातील चपलाही न काढता व्यापारी व हमालाकडून चालण्याचा प्रकार होतो. शेतकऱ्याने जिवापाड कष्ट करून पिकविलेल्या उसापासून तयार केलेल्या गुळाची चव ठरविण्याचा अधिकारच राहिलेला नाही. तो व्यापाऱ्यांकडूनच ठरविला जातो.या साऱ्याप्रकाराबरोबरच अवकाळीचे कारण पुढे करून गुळाचे दर पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांनी कारखान्यांना ऊस देण्यास पसंती दिली आहे. यातून गुऱ्हाळघरांवर संक्रांत येणार असून, हा कुटिरोद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.