उद्या पेपर अन् आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची केली चोरी; धक्कादायक प्रकार आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:13 IST2026-03-17T15:12:14+5:302026-03-17T15:13:11+5:30
सांगोल्यातील परीक्षा केंद्राच्या स्ट्राँग रुममधून दहावीच्या भूगोलचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे.

उद्या पेपर अन् आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची केली चोरी; धक्कादायक प्रकार आला समोर
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. या दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची स्ट्राँग रूम फोडून भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या आधी गणिताचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले होते.
उद्या एसएससीचा भूगोलचा पेपर आहे, या पेपर आधीच ही प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या वर्षी अनेक ठिकाणी पेपर फुटी आणि कॉफीचे प्रकार समोर आले आहेत. दरम्यान, आता आज सांगोल्यात थेट स्ट्रॉंग रूम तोडून उद्या होणाऱ्या भूगोलाचे ५० पेपर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
'त्या' 8 खासदारांचे निलंबन मागे; जाणून घ्या भाजप-काँग्रेसच्या 'सीजफायर'ची INSIDE STORY
आज सकाळी शिक्षण विभाग आणि कस्तोडियन हे कालचे उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टात टाकण्यासाठी आले असता स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसले. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथे बोर्ड परीक्षेचे सर्व पेपर ठेवण्याचे स्ट्रॉंग रूम असून या स्ट्रॉंग रूम मधून ही चोरी झाली आहे.
आज सकाळी साडेआठ वाजता या स्ट्रॉंग रूम जवळ अधिकारी पोहोचल्यावर कुलूप कापल्याचे दिसले. या स्ट्रॉंग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळालेले नाही.
बोर्डाच्या पेपर ठेवलेले स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिकाची चोरी होणे हा प्रकार धक्कादायक आहे. या घटनेनंतर सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डी वाय एस पी बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहचले आहेत.
सीईओ कुलदीप जंगम यांची तत्परता...
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी चर्चा केली. घटनेची सविस्तर माहिती घेऊन शिक्षण विभागाला आवश्यक त्या सुचना दिल्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशीही सीईओ जंगम यांनी संपर्क साधून तपासाच्या अनुषंगाने चर्चा केली.