ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:28 IST2025-09-29T13:27:25+5:302025-09-29T13:28:15+5:30
यावेळी घरातील सामान देखील वाहून गेले. तहसीलदार यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. मात्र, पुराने ६० कामगारांची सुटका पंधरा दिवसांच्या आत दिवसात तिसऱ्यांदा महापूर आला.

ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
माढा : माजी मंत्री तानाजी सावंत यांनी या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा संपर्क संपर्क केला नसून, ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार आहे, असा आरोप प्रा. शिवाजी सावंत यांनी केला.
शिवाजी सावंत म्हणाले, सीना कोळेगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा साठवून ठेवण्यात आला. याची दक्षता घेण्यात आली नाही. धरण क्षेत्रात परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व धरणात असलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे धरणातून दोन लाख क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने महापूर आला. घरातल्या तेल, डाळी, तिखट, मिठासह प्रपंच वाहून गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ ५० किलो धान्य व २५ हजार रुपयांची रोख मदत करून दिलासा देण्याची गरज असल्याचे मत शिवाजी सावंत यांनी व्यक्त केले. सावंत यांच्या जयवंत बंगल्याचा एक मजला पूर्णपणे पाण्याने भरला होता.
यावेळी घरातील सामान देखील वाहून गेले. तहसीलदार यांच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. मात्र, पुराने ६० कामगारांची सुटका
पंधरा दिवसांच्या आत दिवसात तिसऱ्यांदा महापूर आला.
यादरम्यान साफसफाईसाठी आलेले ५० ते ६० कामगार अडकले होते. यावेळी सरपंच ऋतुराज सावंत यांनी छाती इतक्या पाण्यात स्वतः कामगारांना बाहेर काढल्याने कामगारांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कामगार घराकडे जाताना अचानक पाणी वाढल्याने भयभीत झाले होते. मात्र, सहकाऱ्यांसोबत त्यांना दिलासा देत बाहेर काढल्याने या कामगारांना घराकडे जाण्यासाठी मदत झाली.
इतका महापुराचा वेडा घातला होता, शासकीय मदत देखील पोहोचवण्यासाठी चार दिवस लागले. यंत्रणेला वारंवार संपर्क केला, मात्र पूर आल्यानंतर चौथ्या दिवशी शासकीय यंत्रणेची मदत मिळाली. मात्र, या अगोदर पृथ्वीराज सावंत व सरपंच ऋतुराज सावंत यांच्यासह नातेवाईक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या बोटीतून गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.