Maharashtra Crime: दुचाकी चोरून भरधाव वेगाने पळून जाताना दुसऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचोराचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवार, दि. १३ रात्री ११:३०च्या सुमारास सांगोला ते मिरज रोडवरील वाटंबरे हद्दीतील पांडेजी धाब्यानजीक घडला.
संजय प्रकाश वायभट व रामकृष्ण पुंडलिक वायभट (दोघेही रा. पिंपळनेरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) अशी जखमींची नावे आहेत, तर मृताचे नाव व पत्ता समजू शकला नाही.याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
जखमी संजय वायभट व रामकृष्ण वायभट असे दोघेजण मिळून गुरुवारी रात्री ११:३०च्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २३ बीजे २६९९) मिरजहून सांगोल्याकडे येत होते.
मृत चोरटा सांगोल्यात चोरी केलेल्या दुचाकीवरून (एमएच ०९ बीएफ ७४०८) सांगोल्यांकडून भरधाव वेगाने मिरज रोडने निघाला होता. वाटेत वाटंबरे, ता. सांगोला हद्दीतील एका धाब्यानजीक दोन्हीही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली.
Web Summary : A motorcycle thief died in a head-on collision near Sangola while fleeing on a stolen bike. Two others on the other motorcycle were seriously injured and are receiving treatment. The accident occurred late Thursday night. The thief's identity remains unknown.
Web Summary : सांगोला के पास चोरी की मोटरसाइकिल पर भागते समय एक चोर की टक्कर में मौत हो गई। दूसरी मोटरसाइकिल पर सवार दो लोग गंभीर रूप से घायल हैं। दुर्घटना गुरुवार देर रात हुई। चोर की पहचान अभी तक नहीं हो पाई है।