शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी नेमण्यावरून मंदिर समितीचा ‘यु टर्न’

By admin | Updated: June 12, 2014 00:54 IST

ब्राह्मणेतर, महिलांचा समावेश तूर्त नको

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पूजा व विधीसाठी ब्राह्मणेतर समाजातील पुजाऱ्यांबरोबरच महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेऊन तसा ठरावही केला होता. दरम्यान वारकरी संघटनेने आंदोलने छेडण्यास सुरुवात केल्याने मंदिर समितीने यु टर्न घेत ‘पुजारी नेमताय थोडं थांबा’ असे म्हणत ब्राह्मणेतर व महिलांचा समावेश करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील बडवे-उत्पातांना काढून त्यांच्या जागी स्वतंत्र पुजारी नेमण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मंदिर समितीने स्थानिक कर्मचाऱ्यांना पूजा व विधी करण्याची जबाबदारी दिली होती. दरम्यान शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यासाठी पुजाऱ्यांचे अर्ज मागवून १८ मे रोजी त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यासाठी राज्यासह परराज्यांतील तब्बल १२९ जणांनी सहभाग घेतला. यात १६ महिलाही होत्या. दरम्यान मंदिर समितीने पूजेसाठी ब्राह्मणेतर समाजातील पुजाऱ्यांबरोबर महिलांनाही पूजेसाठी नेमण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वारकरी, फडकरी व अन्य वारकरी संघटनेकडून विरोध होत असल्याने हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. पुजाऱ्यांच्या मुलाखती पंचांगकर्ते मोहन दाते, माणिक जंगम, श्रीनिवास पल्ललू यांनी घेतल्या तर निमंत्रित म्हणून मंदिर समितीचे सदस्य वसंतराव पाटील, जयवंत भंडारे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे यांनी काम पाहिले. पुजारी नेमण्याबाबत मंदिर समिती न्याय व विधी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली करीत असल्याने वारकऱ्यांनी रान पेटविले व महिला, ब्राह्मणेतर समाजाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. असे निर्णय घेण्याचा अधिकार मुळात अस्थायी असलेल्या मंदिर समितीला नसल्याचा आरोप केला. यामुळे मंदिर समितीने सावध भूमिका घेत ऐन आषाढीच्या तोंडावर डोकेदुखी नको म्हणून आपला निश्चित निर्णय बदलत पुजाऱ्यांच्या नियुक्त्या लांबणीवर टाकल्या आहेत. -------------------------------मंदिर समितीने पुजारी नेमण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर वारकऱ्यांतून विरोध होत आहे. यामुळे आता मंदिर समितीकडून न्याय व विधी विभागाकडे प्रस्ताव दाखल करून मत मागविणार आहोत. त्या विभागाच्या आदेशानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.- संजय तेली, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतल्यानंतर देशासह परदेशातूनही या निर्णयाचे कौतुक झाले. मात्र याला विरोध होत असल्याने आता न्याय व विधी विभागाच्या सूचनेनुसार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.- वसंतराव पाटील, सदस्य, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर