पाहुण्याला शिवीगाळ नको म्हणताच त्यानं पत्नी अन्‌ आईला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:34+5:302021-01-08T05:12:34+5:30

सुरेखा जालिंदर लांडगे व शिल्पा आकाश लांडगे अशी मारहाणीतील जखमी सासू-सुनेचे नाव आहे. याबाबत, हंगिरगे येथील सुरेखा जालिंदर ...

As soon as he did not want to insult the guest, he beat his wife and mother | पाहुण्याला शिवीगाळ नको म्हणताच त्यानं पत्नी अन्‌ आईला केली मारहाण

पाहुण्याला शिवीगाळ नको म्हणताच त्यानं पत्नी अन्‌ आईला केली मारहाण

सुरेखा जालिंदर लांडगे व शिल्पा आकाश लांडगे अशी मारहाणीतील जखमी सासू-सुनेचे नाव आहे. याबाबत, हंगिरगे येथील सुरेखा जालिंदर लांडगे यांचा मुलगा आकाश लांडगे हा मद्यप्राशन करून सुरेखा लांडगे यांच्या पाहुण्यांना शिवीगाळ करू लागला म्हणून आईने मुलास तू पाहुण्यांना शिवीगाळ करू नको असे का म्हणाली म्हणून त्याने आई सुरेखा हिस मारहाण करून शिवीगाळ करू लागला म्हणून त्याची पत्नी शिल्पा लांडगे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता त्याने तिलाही शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याने एवढ्यावरच न थांबता घरात घुसून घरातील कपाटाचे आरसे फोडून खुर्च्या तोडून नासधूस केली व घरासमोरील दुचाकी ढकलून दिल्याने सुमारे २ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत सुरेखा जालिंदर लांडगे यांनी मुलगा आकाश जालिंदर लांडगे रा.हंगिरगे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

----

Web Title: As soon as he did not want to insult the guest, he beat his wife and mother