सोलापुरी शड्डू ; महागड्या जिममुळे कामगारांच्या मुलांची मेहनत आखाड्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:58 AM2018-11-28T10:58:59+5:302018-11-28T11:01:14+5:30

काशिनाथ वाघमारे।  सोलापूर : गिरणी कामगारांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया गवळी वस्ती (देगाव रोड) मध्ये महागड्या जिममुळे कामगारांची मुले ...

Solapuri Shaddu; Workers' hard work in the akhada | सोलापुरी शड्डू ; महागड्या जिममुळे कामगारांच्या मुलांची मेहनत आखाड्यात 

सोलापुरी शड्डू ; महागड्या जिममुळे कामगारांच्या मुलांची मेहनत आखाड्यात 

googlenewsNext
ठळक मुद्देया तालमीतून केवळ मल्लांचा सरावच होतो नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक वारसाही जपला जिमच्या ६८ वर्षांत असंख्य पैलवान पोलीस, सैनिक आणि प्रशासकीय अधिकारी बनून तालमीचा नावलौकिक वाढविला दोन तास जवळपास ३५ मल्ल सराव करताहेत दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे

काशिनाथ वाघमारे। 
सोलापूर : गिरणी कामगारांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया गवळी वस्ती (देगाव रोड) मध्ये महागड्या जिममुळे कामगारांची मुले आखाड्यात सराव करताहेत. जिमच्या ६८ वर्षांत असंख्य पैलवान पोलीस, सैनिक आणि प्रशासकीय अधिकारी बनून तालमीचा नावलौकिक वाढविला आहे़ या जिममध्ये आज दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास जवळपास ३५ मल्ल सराव करताहेत दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.

१९५० पासून या तालमीत मल्ल घडताहेत़ सुरेश निंबाळकर यांनी अनेक वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळात मल्लांना प्रोत्साहन दिले़ त्यांच्या निधनानंतर महादेव गवळी आणि औदुंबरबुवा जगताप यांनी हा वारसा चालविला़ २५ वर्षांपूर्वी पत्र्याच्या तालमीचा लूक आता बदलला आणि या तालमीत व्यायामाचीही काही साधने दाखल झाली़ आज जिमच्या जमान्यातही मुलांचा या तालमीकडे कल आहे़ जाम मिल, लक्ष्मी-विष्णू, नरसिंग गिरजी मिलमधील सेवानिवृत्त कामगारांची मुले या जिममधून तयार झाली आहेत़ काही मल्ल हे शिक्षण घेताहेत तर काही मुले अर्धवेळ काम करून तालमीत सराव करताहेत.

या तालमीच्या उस्तादांनी सामाजिक उपक्रमावरही भर दिला आहे़ मल्लांच्या गुणवंत मुलांना विविध प्रकारची मदत करतात़ याबरोबरच बौद्धिक विकासासाठी विविध स्पर्धा घेतात़ या मल्लांना घडविण्यासाठी बाळासाहेब गवळी, विजय घुले, ब्रह्मदेव खटके, ईश्वर अहिरे प्रयत्न करताहेत़

तालमीतून सुरू झाले उत्सव
- या तालमीतून केवळ मल्लांचा सरावच होतो नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक वारसाही जपला गेला आहे. याचाच एक भाग म्हणून मागील काही वर्षात या तालमीतील मल्लांनी गणेशोत्सव सुरु केला. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव आणि शिवजयंतीही सुरु केली़ यामुळे पूर्वजांच्या इतिहासाची उजळणी या मल्लांमध्ये होतेय़ या उत्सव काळात हे मल्ल तालमीच्या सरावाबरोबर लेझीम आणि ढोलचाही सराव करतात.

रोज दहा किमी पळतात
- गरीब कामगारांची मुले म्हणून ओळखल्या जाणाºया गवळी वस्तीतील मल्लांना आज चांगला खुराक मिळत नसला तरी दूध, अर्धा डझन केळी आणि खजुरावर सराव करताहेत़ याबरोबरच दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास सराव चालतो़ देगाव रोडला दररोज १० किलोमीटर धावतात़ ५०० जोर आणि ५०० बैठका काढतात़ त्यांच्याकडून उस्ताद औदुंबर जगताप हे तयारी करवून घेतात़ दररोज ते या मल्लांसोबत सकाळी उठून धावतात.

नावाजलेले मल्ल
- अंबऋषी पैलवान, नामदेव निंबाळकर, वड्डा लक्ष्मण, दिगंबर गायक वाड, दाऊद पैलवान, कासीम पैलवान, भारत पवार, मधू निंबाळकर, शब्बीर दखणीकर हे स्थानिक पातळवर मल्लगिरीतून चमकले़ याशिवाय बाबा सुरवसे हे मल्ल यापूर्वी सिद्धेश्वर आखाडा गाजवला़ सलग २५ कुस्त्या जिंकण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला़ 

Web Title: Solapuri Shaddu; Workers' hard work in the akhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.