राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दहीगाव जिल्हा परिषद गटामध्ये राम सातपुते यांच्या पत्नी आणि भाजपाच्या उमेदवार संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयानंतर संस्कृती सातपुते यांनी मोठमोठ्या वल्गना करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली आहे, अशा शब्दात उत्तम जानकर यांना टोला लगावला आहे.
मिनी विधानसभा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये राज्यातील अनेक नेत्यांचे वारस आणि नातेवाईकही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असल्याने निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अशीच अटीतटीची लढत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील दहीगाव जिल्हा परिषट गटात रंगली होती. या ठिकाणी माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते ह्या आमने सामने आले होते. त्यात संस्कृती सातपुते यांनी बाजी मारली.
जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संस्कृती सातपुते म्हणाल्या की, हे यश मी विजयासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला समर्पित करते. ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती. या ठिकाणी विरोधकांचा सुफडा साफ झाला आहे आणि भाजपाला संपवणारा जन्माला यायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार उत्तम जानकर यांना टोला लगावताना त्या म्हणाल्या की, जी व्यक्ती जनतेसोबत असते, त्या व्यक्तीसोबत येथील मतदार उभे राहिले आहेत. टोकाच्या वल्गना करणाऱ्यांना जनतेने त्यांची त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे संस्कृती सातपुते म्हणाल्या.
Web Summary : Sanskruti Satpute defeated Uttam Jankar's son, stating that the public taught boastful individuals a lesson. She dedicated her victory to the workers and public, emphasizing the people's support and BJP's strength.
Web Summary : संस्कृति सातपुते ने उत्तम जानकर के बेटे को हराया, कहा कि जनता ने डींग मारने वालों को सबक सिखाया। उन्होंने अपनी जीत कार्यकर्ताओं और जनता को समर्पित की और लोगों के समर्थन और भाजपा की ताकत पर जोर दिया।