Solapur: दिलासादायक; नव्या वधू-वरांचे हेलपाटे थांबणार, विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार

By Appasaheb.patil | Published: June 8, 2023 07:55 PM2023-06-08T19:55:52+5:302023-06-08T19:56:18+5:30

Solapur: विवाह नोंदणी व प्रमाणपत्राची सेवा सोलापूर महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर साक्षीदार व आवश्यक ती कागदपत्रं सांगितलेल्या दिवशी महापालिकेत आल्यावर तात्काळ विवाह नोंदणी व प्रमाणपत्र मिळणार आहे.

Solapur: Soothing; New brides and grooms will stop, marriage certificate will be available online | Solapur: दिलासादायक; नव्या वधू-वरांचे हेलपाटे थांबणार, विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार

Solapur: दिलासादायक; नव्या वधू-वरांचे हेलपाटे थांबणार, विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळणार

googlenewsNext

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर - विवाह नोंदणी व प्रमाणपत्राची सेवा सोलापूर महापालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर साक्षीदार व आवश्यक ती कागदपत्रं सांगितलेल्या दिवशी महापालिकेत आल्यावर तात्काळ विवाह नोंदणी व प्रमाणपत्र मिळणार आहे. यासाठी महापालिकेने सहज, सोपी व वेळेची बचत करणारी यंत्रणा कार्यान्वीत केली आहे.

शहरातील नागरिकांना सेवा ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्त शितल तेली-उगले यांनी आदेश दिले होते. त्यानुसार विवाह नोंदणी विभागाने विवाह नोंदणी व प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार महापालिकेने https;//www.solapurcorporation.gov.in/ वर क्लिक केल्यानंतर ई सव्र्हिस-18 मॅरेज रजिस्ट्रेशनवरून संपूर्ण माहिती वाचावी त्यानंतर नोंदणीसाठी पुढे जा म्हटल्यावर ऑनलाइन माहिती भरावी. यात अर्जदाराची माहिती, विवाहाचे स्थळ, वेळ, ठिकाण, वर व वधुचे नाव, साक्षीदारांची माहिती भरावी त्यानंतर मागणी केलेले कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर सेव्ह करून पेमेंट केल्यावर फॉर्म सबमिट होईल त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळणार आहे.

विवाह प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रं -

- वर-वधूचे आधारकार्ड

- वर-वधुचा शाळा सोडलेला दाखला, जातीचा दाखला

- पत्याच्या पुराव्याचा एक पुरावा, पुरोहित, काझीचे आधारकार्ड,

- साक्षीदारांचे आधारकार्ड, लग्नपत्रिका, लग्नातील फोटो

आंतरजातीय, घटस्फोटित, विधूर विवाहासाठी...
आंतरजातीय विवाह असेल तर आंतरजातीय विवाह असेल तर शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर शपथपत्र करून आणावे. वर व वधु यांचे स्वतंत्र शंभर रूपयांचे स्टॅम्पवर शपथपत्र करून आणावे. घटस्फोटित असल्यास घटस्फोटाचा न्यायालयीन हुकुमनामा जोडणे आवश्यक आहे. विधुर असल्यास पहिल्या पती, पत्नीचे मृत्यू दाखला आणणे आवश्यक आहे.

Web Title: Solapur: Soothing; New brides and grooms will stop, marriage certificate will be available online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.