नातेपुते हादरले! 'बारामतीला राहायला चल' म्हणत पत्नी अन् मेव्हण्याने केला पतीचा खून; २४ तासात आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:49 IST2026-03-17T14:55:15+5:302026-03-17T15:49:54+5:30

सोलापुरात पत्नी आणि मेव्हुण्याने मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली.

Solapur Horror Wife and Brother in law Kill Man Over Dispute to Move City Both Arrested Within 24 Hours | नातेपुते हादरले! 'बारामतीला राहायला चल' म्हणत पत्नी अन् मेव्हण्याने केला पतीचा खून; २४ तासात आरोपी जेरबंद

नातेपुते हादरले! 'बारामतीला राहायला चल' म्हणत पत्नी अन् मेव्हण्याने केला पतीचा खून; २४ तासात आरोपी जेरबंद

Solapur Crime: सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते इथे कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि मेव्हण्याने मिळून हा कट रचला होता. नातेपुते पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मयत विजय डोंग्या भोसले (वय ३५) हे नातेपुते येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी कांती भोसले आणि मेव्हणा रया उर्फ बिऱ्या काळे यांनी विजय यांच्याकडे 'बारामतीला राहायला चल' असा तगादा लावत होते. याच कारणावरून १४ मार्चच्या रात्री ११ च्या सुमारास पर्वतेश्वर माळ परिसरात त्यांच्यात जोरदार वाद झाला.

दगड आणि सुरीने भीषण हल्ला

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि मेव्हणा रया काळे याने रागाच्या भरात विजय यांच्या डोक्यात दगड घातला. त्याचवेळी पत्नी कांतीने सुरीने त्यांच्या कानावर वार केले. या भीषण हल्ल्यात आणि लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विजय भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांचा 'रहिमतपूर'पर्यंत पाठलाग

घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी आधी मयताची पत्नी कांती भोसले हिला ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी रया उर्फ बिऱ्या भोसले हा पळून गेला होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले. गुन्हा घडल्यापासून २४ तासांच्या आत आरोपीला अटक केल्याबद्दल पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Web Title : पत्नी, साले ने पति की हत्या की; आरोपी गिरफ्तार!

Web Summary : सोलापुर में पत्नी और उसके भाई ने बारामती जाने के विवाद में विजय भोसले की हत्या कर दी। पुलिस ने तत्परता दिखाते हुए 24 घंटे के भीतर आरोपियों को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Wife, brother-in-law murder husband over Baramati move; Arrested!

Web Summary : In Solapur, a wife and her brother murdered her husband, Vijay Bhosle, after arguing about moving to Baramati. Police swiftly arrested both suspects within 24 hours near Rahimatpur.