Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:19 IST2025-08-27T18:16:53+5:302025-08-27T18:19:03+5:30
Solapur Crime news: सोलापूर शहरात एक संतापजनक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या बापाने अनेकवेळा बलात्कार केला. पीडित मुलीने पोलिसांना सगळी आपबीती सांगितल्यावर हा प्रकार उजेडात आला.

Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
अल्पवयीन मुलीला जन्मदात्या बापानेच आपल्या वासनेची शिकार केली. याची सुरूवात २०२२ मध्ये झाले. बापाचे आईसोबत भांडण झाले. वादात आईला घराबाहेर काढले. त्यानंतर त्याने पोटच्या मुलीसोबतच अश्लील कृत्य केले. त्यानंतर २ जुलै २०२५ पर्यंत बापाने अनेक वेळा मुलीवर अत्याचार केले. तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली, तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. वासनेच्या आहारी गेलेल्या जन्मदात्या पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल खुद्द पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली.
जुलै २०२२ ते २ जुलै २०२५ या काळात वारंवार असे कृत्य केल्याचे अखेर पीडितेने २५ जुलै रोजी तक्रार दिल्याने अत्याचार आणि पोक्सो (बाल लैंगिक) छळाचा विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
आईसोबत वाद, मुलीवर अत्याचार
यातील पीडिता ही आई व वडिलांसह शहरातील एका परिसरात वास्तव्यास आहे. साधारण जुलै २०२२ मध्ये पीडितेच्या वडिलांनी आईशी भांडण करून तिला घराबाहेर काढून पीडितेशी जबरदस्तीने अश्लील कृत्य केले.
पीडितेला जिवे मारण्याची धमकी
या प्रकारानंतर याबाबत कोणाला काही बोललीस, तर तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन, अशी पीडितेला धमकी दिली. यामुळे पीडितेने घाबरून कोणाला काहीही सांगितले नाही. हा प्रकार २ जुलै २०२५ पर्यंत चालल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस अधिकारी करीत आहेत.