Solapur Crime: कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:07 IST2025-07-24T19:01:22+5:302025-07-24T19:07:48+5:30
पीडित महिला कर्नाटकातील असून, पाच महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकात हा गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Solapur Crime: कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार
Solapur Crime latest News: वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करण्याचे आमिष दाखवून सोलापुरात बोलावून घेतले. मठात भाड्याच्या खोलीमध्ये डांबून ठेवले अन् जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने कर्नाटकातील शहाबाद पोलिस ठाण्यात दाखल केली. ती विजापूर नाका पोलिस ठाण्यात वर्ग झाल्याने मंगळवारी (२२ जुलै) रात्री उशिरा नोंदली. गुन्हा मार्च महिन्यात घडल्यानंतर पाच महिन्यांनी नोंदला गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शंकर हिरालाल लोखंडे (वय ४५, रा. रामवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बी. एन. एस. ६४ (२) (एम), १२७ (४)६९, ३५१ (३) कलमान्वये गुन्हा नोंदला आहे.
महिलेसोबत नक्की काय घडले?
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सगळा घटनाक्रम सांगितला आहे. पीडित महिला शहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. तुझ्या वाढदिवसानिमित्त सोलापुरला जाऊन कपडे घ्यायचे आहेत म्हणून आरोपीने ५ ते १८ मार्च २०२५ या काळात आणले.
आरोपी सोलापूर ५ मार्च रोजी सोलापूर शहरात आला. महिलेला घेऊन त्याने एका मठात भाड्याने खोली घेतली आणि तिथेच पीडित महिलेला डांबून ठेवले.
महिलेवर अनेकवेळा बलात्कार
तुझ्याशी लग्न करेन, असे म्हणून वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास मारून टाकेन, अशी धमकीही दिली.
या प्रकारानंतर पीडितेने कर्नाटकातील गावी गेल्यानंतर २१ जुलै रोजी शहाबाद पोलीस ठाणे गाठले. तेथे फिर्याद नोंदविली.
सदरची घटना सोलापुरात घडल्याने हा गुन्हा तेथील पोलिसांनी विजापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. त्यानुसार २२ जुलैच्या रात्री उशिरा गुन्हा नोंदल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस ठाण्यास भेटी देऊन पीडितेचे कैफियत जाणून घेतली. अधिक तपास महिला सपोनि बोधे करीत आहेत.