Accident News in Marathi: चौकात वळत असतानाच ट्रकच्या डाव्या बाजूने येत असलेल्या मोटारसायकल स्वाराने अचानक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेत दुचाकी ट्रकखाली आली आणि मोटारसायकलवरील दोघे चिरडले गेले. सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात हा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे.
सैपन पटेल आणि हुजूर पटेल अशी या अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात बोरामणी नाक्यावर एक ट्रक येत आहे. त्याच्यासमोर एक कार आहे. कार डावीकडे वळाली. त्यानंतर ट्रकही वळला.
याचदरम्यान, ट्रकच्या पाठीमागून मोटारसायकल आली. वेगात असलेल्या मोटारसायकल स्वाराने ट्रक वळत असतानाही कट मारून ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकल खूप जवळ असल्याने ट्रक चालकाला दिसलीच नाही आणि ते ट्रकखाली आले. काही क्षणात झालेल्या घटनेत मोटारसायकलीवरील दोघे ट्रकखाली चिरडले गेले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पथक तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी कपड्यांनी झाकलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत.
Web Summary : In Solapur, a motorcycle attempting to overtake a turning truck resulted in a tragic accident. Two individuals, Saipan Patel and Huzur Patel, were crushed and killed instantly. Police are investigating the incident captured on CCTV at Boramani Naka.
Web Summary : सोलापुर में एक ट्रक को ओवरटेक करने की कोशिश में मोटरसाइकिल सवार दो लोगों की दर्दनाक मौत हो गई। मृतकों की पहचान सैपन पटेल और हुजूर पटेल के रूप में हुई है। पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर जांच कर रही है।